Laxman Hake on Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमतः निषेध करतो. आम्ही लोकशाही मानणारी माणसे आहोत. मात्र संभाजी ब्रिगेडने गेल्या 15 ते 20 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात हेच केलं आहे ना? त्यांनी गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळ करण्याचं काम केलं आहे. अनेक ग्रंथालय फोडली, पुतळे उकडून फेकले. बहुजन समाजातील काही नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलं. आज गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर बहुजनांवर हल्ला झाला, पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला, अस पुढे येतंय.
पण विधानसभेच्या अगोदर लक्षण हाके यांच्यावर हल्ला का झाला होता? कोणत्या ब्रिगेड ने केला होता? त्यावेळी प्रवीण गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत. प्रवीण गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत. नाव बहुजनांच घ्यायचं काम मात्र पवार कुटुंब, कोल्हापूरचे महाराज वतनदार झागीरदारांच करायचं, आणि संघर्ष करायची वेळ आली की घरात लपून बसायचं. अशी बोचरी टीका ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केली आहे.
वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत
पुढे बोलताना ते म्हणाले की, एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पाईक आहे. दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामांनी पक्ष दिला, निवडणुका लढल्या त्याच्या एकाही मुद्द्याला फॉलो नाही करायच. हे कसले पुरोगामी? काय आहे तुमचा बहुजनवाद? बहुजनवादात मराठा सोडून इतर कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिले आहे. मी प्रवीण गायकवाड यांना साहित्यातला खूप मोठा पुरस्कार द्यावा, म्हणून शिफारस करतो. चॅरिटेबल काम करून परिवर्तन होत नसतं, त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते. वतनदारांचे जीवन जगून सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत. बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो. असेही लक्ष्मण हाके यावेळी म्हणाले.
प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात, पण काम वतनदारांच करतात- लक्ष्मण हाके
प्रवीण गायकवाड हे महादेव जानकर, आण्णासाहेब डांगे, शेंडगे कुटुंबाबद्दल बरंच बोलले आहेत. रासपच्या पक्ष स्थापनेच्या पहिल्या स्टेजवर होतात तर मग नंतर कुठे गेलात? एक धनगराच पोरगं पक्ष चालवतेय म्हणून तुम्हाला तिथे जावं, अस वाटल नाही. तिथे तुम्ही जात वर्चस्वाची भावना आड आणली. ज्या शरद पवारांची तळी उचलतात हे प्रवीण गायकवाड त्यांना सवाल आहे, ज्यावेळी सोनिया गांधी बरोबर फारकत घेऊन पवार दिल्लीहून मुंबईत आले त्या विमानतळावर सर्वात पहिला हार घालणारे आमचे स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे होते. त्यावेळी शेंडगे बापूंच स्टेटमेंट होत की मी तमाम धनगर समाजाच्या वतीने शरद पवार यांना पाठिंबा देतोय. शरद पवार यांनी शेंडगे यांना काय फळ दिलं? तर पुढच्याच निवडणुकीत कवठे महांकाळ मतदारसंघात शिवाजी शेंगडे यांचा प्रभाव केला.
माढा लोकसभा मतदारसंघात 6 ते 7 लाख लोक होती. तुम्ही माझ्या अडीचशे मतावर बोलताय. मी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. महादेव जानकर बारामती लोकसभा मतदारसंघात उभे होते. त्यांची काय ग्रामपंचायत होती का इथे? तरी त्यांनी तुम्हाला घाम फोडला होता. आम्ही वंचित घटकातील आहोत. आमची तेवढी हैशियत असती तर आम्ही तुम्हाला कशाला तिकीट मागायला आलो असतो. प्रवीण गायकवाड बात बहुजनांची करतात पण काम वतनदारांच करतात अशी टीका ही लक्ष्मण हाके यांनी यावेळी केली.
अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपताय
प्रवीण गायकवाड नेहमी मनुवादी भाजपवर टीका करतात. अजित पवार त्याच मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमधील खीर वरपण्याचं काम करत आहेत ना? अजित पवार कोपराला वगळ येईपर्यंत खीर वरपत आहेत. तुम्ही कधी बहुजनांची लढाई लढलात. या पवारांनी, या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी एकूण बजेट मधील 1 टक्का तरतूद ओबीसीला केली नाही. प्रवीण गायकवाड यांनी नेहमी इतिहास उकरून काढला, ब्राम्हणांवर टीका केली. कधी माळी तर कधी धनगराच्या नेत्याला टार्गेट केलं. महाराष्ट्रात दोन नंबरला संख्या असणाऱ्या धनगर समाजाचं एकही कारखाना होऊ शकला नाही. प्रवीण गायकवाड अभी तो बात सुरू हुई है, बात दूर तक जाएगी, आशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी सूचक वक्तव्य करत प्रवीण गायकवाड यांच्यावर टीका केलीय.
सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळतं?
सामाजिक न्याय विभागातील कामकाजाला घेऊन नाराजीला जबाबदार अजित पवार आहेत, ते जातीयवादी आहेत. आदिवासी विभागाचा शेकडो कोटींचा निधी, समाजकल्याणचा शेकडो कोटी निधी, ओबीसीच्या महाज्योतीची 150 कोटीचा बॅकलॉक सारथीच्या विद्यार्थ्यांना 8 लाख जमा करणारे हे अजित पवार महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना एक रुपया द्यायला तयार नाहीत. सोशल जस्टिस म्हणजे काय? अजित पवारांना काय कळतं. महाराष्ट्रातील लोकांनी कारखानदारांच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. अजित पवारांकडून आम्हाला न्यायची अपेक्षा नाही, फडणवीसांवर आमचा विश्वास आहे. येऊ घातलेल्या काळात मुख्यमंत्री बोलले नाहीत तर संघर्ष पुढचा काळ ओबीसींचा असेल. असेही लक्ष्मण हाके म्हणाले.
माहिती अधिकारी कार्यकर्ते पोपट धावडे यांच्या कार्यालयाला भेट दिली आहे. माळेगांव नीरा वागज या आजूबाजूच्या गावात ही भेटी दिल्या. आगामी काळात राज्यातील ओबीसी जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांचा खूप मोठा लढा उभा राहतोय. अधिवेशन संपताच त्याच्या बैठका राज्यात आम्ही सुरू करीत आहोत. त्या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज बारामतीत आलो आहे. अशी प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली.
हे ही वाचा