लातूर : मुंडेसाहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं. त्यामुळे त्या वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाटेला आलं असं वक्तव्य राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं. फेकलेले तुकडे घ्यायची नाहीत, नेहमीच बेरजेचं राजकारण करायचं अशी वडिलांनी शिकवण दिली असंही त्या म्हणाल्या. लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

माझ्या वडिलांनी त्यांच्या तोंडातून सांगितलं की मी त्यांची वारस आहे. त्यामुळे त्या वारशाला सुईच्या टोकाइतकाही धक्का लागू देणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आला, अडचणी आल्या. परंतु आम्ही संस्कारात वागलो, कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही असं त्या म्हणाल्या.

Pankaja Munde Latur Speech : मुंडेसाहेबांनी सांगितलं, पंकजा तू माझी वारस

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "मुंडेसाहेबांनी जिवंतपणी मला वारस घोषित केलं होतं. हा वारसा संपत्ती, जमीन, पैसा याच्यापलिकडे होता. माझे वडील माझे गुरू होते. त्यांनी मला काय करायचं हे कधीच शिकवलं नाही, पण काय करायचं नाही हे मात्र त्यांनी शिकवलं."

माझ्या वडिलांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहतोय आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, मी मंत्री आहे हे प्रेम आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde On Gopinath Munde : बेरजेचं राजकारण करण्याचा सल्ला

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "कुणी टाकलेले तुकडे उचलू नका, स्वाभिमान गहाळ करु नको. परिस्थितीशी कधीही झुकायचं नाही असं मुंडे साहेबांनी आपल्याला सांगितलं. राजकारणात काम करताना कुणाबद्दल द्वेष बाळगायचा नाही. नेहमीच गणित बेरजेचं करायचं असते असं मुंडे साहेबांनी मला सांगितलं. ते देवेंद्र फडणवीसांनी तंतोतंत पाळलं. म्हणून आज सत्तेत आहोत."

Gopinath Munde Statue Latur : मुंडे साहेबांची सुधारित आवृत्ती

पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझी कार्यपद्धती ही मुंडे साहेबांच्या सारखी नाही असं अनेकजण म्हणतात. होय, माझी कार्यपद्धतीन ही त्यांच्यासारखी नाही, पण त्यांना अपेक्षित अशीच आहे. तुला गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे, पण सुधारित आवृत्ती व्हायची आहे असं मुंडे साहेबांनी मला सांगितलं होतं. त्यामुळे कधीही स्वाभिमान गहाळ न करता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या वडिलांना दिलं. त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही."

Pankaja Munde On Devendra Fadnavis : त्यावेळी देवेंद्र फडणवीस दिल्लीत होते

पंकजा मंडे या गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत भावुक झाल्याचं दिसून आलं. त्या म्हणाल्या की, "गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला, त्यावेळी मी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तिथे कुणीही ओळखीचे नव्हते. त्या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस उभे होते. ते एकमेव ओळखीचे असल्याने मी तिथेच ठाहो फोडला. मी दिल्लीपर्यंत जाईपर्यंत मला आशा होती की काहीतरी चमत्कार होईल आणि मुंडेसाहेब उठून बसतील. पण ती आशा खोटी ठरली."

ही बातमी वाचा: