Latur News : लातूर (Latur) जिल्हा सोयाबीन (Soybean) उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात यावर्षी सोयाबीनची दुबार आणि तिबार पेरणी करण्याची वेळ आली आहे. सतत पडणारा पाऊस आणि शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. सरकारी पातळीवर पंचनामे करण्यात आले आहेत. हे पंचनामे पडताळून पाहण्यासाठी आता सरकारने ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचं काम सुरू केलं आहे. यासाठीचा पायलेट प्रोजेक्ट लातूर जिल्ह्यातील दोन तालुके आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तालुक्यात करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील करजगाव आणि निलंगा तालुक्यातील चिंचोली भंगार या दोन गावांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून शंकी गोगलगाय प्रादुर्भावाच्या अभ्यासाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्र कृषी विभाग यांची एकच संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठराविक भागातील शेतीची छायाचित्र काढण्यात येणार आहेत. उच्च प्रतीच्या कॅमेऱ्यातून ही छायाचित्रे काढण्यात येणार आहेत. त्यातून कुशल भगाने केलेल्या सर्वेक्षणाची पडताळणी करण्यात येणार आहे. नुकसानीचा अंदाज बांधण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर भविष्यात राज्यात अशा स्वरूपाचा सर्वेक्षण करणे सोपे जाणार आहे.
उच्च दर्जाचा ड्रोन कॅमेरा :
सर्वेक्षण करण्यासाठी वापरण्यात आलेला ड्रोन कॅमेरा अति उच्च दर्जाचा आहे. साडेपाच किलो वजनाचा या ड्रोन मध्ये 24 मेगापिक्सल फिक्सड फोकस लेन्स असलेला कॅमेरा आहे. एक तास हवेत राहण्याची क्षमता यामध्ये आहे. हा ड्रोन निश्चित केलेल्या भागातील अनेक शेतांचे फोटो घेतो. उत्तम प्रकारची ऍक्युरसी या फोटोमध्ये पहावयास मिळत आहे.
अनेक वेळेस शेतकऱ्यांची ओरड असते की आमच्याकडे पंचनामे झाले मात्र, नुकसान भरपाई योग्य पद्धतीने मिळाली नाही. हा प्रोजेक्ट जर यशस्वी झाला तर नुकसानीचा अंदाज बांधणे, शिक्षण नुकसान झालेल्या क्षेत्र कोणते आणि त्याची नुकसान भरपाई कोणाला देण्यात यावी याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :