एक्स्प्लोर

Latur ZP Election Results 2026 : लातुरात अमित देशमुख एकाकी लढले, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजप-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता

Latur Zilla Parishad Election 2026 : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

Latur Zilla Parishad Election 2026 Results Marathi : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले असून, या निकालांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्यातील 59 जिल्हा परिषद गट आणि 118 पंचायत समिती गणांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज पार पडली. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 23 जागा जिंकत जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. दुसरीकडे, मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपला मात्र मोठा धक्का बसला असून त्यांच्या जागा निम्म्यावर आल्या आहेत.

लातुरात अमित देशमुख एकाकी लढले

मागील निवडणुकीत केवळ 15 जागांवर असणाऱ्या काँग्रेसने यंदा मुसंडी मारत 23 जागांवर विजय मिळवला आहे. अमित देशमुख यांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे जुळवत काँग्रेसचे अस्तित्व केवळ टिकवले नाही, तर पक्षाला आठ जागांचा फायदा करून दिला. विशेष म्हणजे, लातूर पंचायत समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले आहे.

भाजपला मोठा फटका, तरीही जिल्हा परिषदेवर सत्ता

गेल्या वेळी 36 जागांसह सत्ता काबीज करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा मोठा फटका बसला आहे. भाजपच्या जागा थेट 18 वर आल्या आहेत. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड यांसारख्या दिग्गजांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती, मात्र मतदारांनी काँग्रेसला पसंती दिल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची दमदार कामगिरी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही या निवडणुकीत आपली ताकद दाखवत 12 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची उदगीर, जळकोट आणि अहमदपूर या तीन तालुक्यांमध्ये युती होती. उर्वरित भागात मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या.

मनसेचे खाते उघडले

कधी नव्हे ते मनसेने जिल्हा परिषदेत एक आणि पंचायत समितीत दोन जागांवर विजय मिळवत लक्ष वेधले आहे. काँग्रेस आणि भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेने मिळवलेला हा विजय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. जिल्हा परिषदेत 1 आणि पंचायत समितीत 2 जागा जिंकल्या. शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या दीर्घकालीन कार्याला मतदारांनी दिलेली पसंती या निकालातून स्पष्ट झाली आहे.

भाजप-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता

लातूरमध्ये काँग्रेसने जास्त जागा जिंकल्या असले, तरीही भाजप-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनीही या निवडणुकीत आपली ताकद दाखवत 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपच्या जागा थेट 18 वर आल्या आहेत. दोन्ही मिळून 30 जागा जिंकल्या आहेत. 

लातूर जिल्हा परिषद विजयी

भाजप :  18
काँग्रेस : 23
शिवसेना : 01
शिवसेना UBT : 01
एनसीपी अजित पवार : 12
एनसीपी शरद पवार : 01
वंचित : 00
मनसे : 01
अपक्ष : 02

हे ही वाचा -

Latur ZP Election Winner List Live : लातूर जिल्हा परिषद निवडणूक 2026 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा एका क्लिकवर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
अमेरिका अन् आखाती देशातील युद्धाचा थेट लातूरवर परिणाम; शेकडो टन माल अडकला, कोट्यावधींची उलाढाल ठप्प
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे.एम.
लातूर पॅटर्नचे जनक.... शिक्षण, राजकारण आणि लेखणीचा त्रिवेणी संगम; ज्येष्ठ साहित्यिक जे. एम.
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Embed widget