एक्स्प्लोर

वडिलांची चिता धगधगत होती, 17 वर्षांच्या मुलीनं काळीज घट्ट करत दिला बारावीचा गणिताचा पेपर, लातूरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

घरात आक्रोश, नातेवाईकांचा आधार आणि आठवणींचा वेदनादायी पूर… अशा वातावरणात शिवानी उभी होती.

Latur: घरात शोककळा पसरलेली… मनात वडिलांच्या आठवणींचा असह्य वेदनादायी पूर. अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या प्रसंगातही एका 17 वर्षीय मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द पाहून संपूर्ण परिसर स्तब्ध झाला आहे. वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासात या मुलीने बारावीच्या गणिताचा पेपर दिलाय. मनाला चटका लावणाऱ्या प्रसंगातही एका 17 वर्षीय मुलीने शिक्षणासाठी दाखवलेली जिद्द संपूर्ण परिसराला मनाला चटका लावून गेली आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हागदळ-गुगदळ भोजूचीवाडी (ता. कंधार) येथील कु. शिवानी माधव देवकत्‍ते हिने वडिलांच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दीड तासांत बारावीच्या गणिताचा पेपर देत सर्वांनाच सुन्न केले. 

नेमकी घटना काय?

शिवानीचे वडील माधव भिमराव देवकत्‍ते हे पुण्यात वाहनचालक म्हणून काम करत होते. कुटुंबाचा आधारस्तंभ असलेले माधव देवकत्‍ते यांचे शुक्रवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. बातमी समजताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता हागदळ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात आक्रोश, नातेवाईकांचा आधार आणि आठवणींचा वेदनादायी पूर… अशा वातावरणात शिवानी उभी होती.

मात्र सकाळी अकरा वाजता जळकोट येथील श्री गुरुदत्त ज्युनियर कॉलेजमध्ये बारावीचा गणिताचा पेपर होता. वडिलांच्या चितेला अग्नी दिल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच शिवानीने मनावर दगड ठेवला. “बाबांनी शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले… त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे,” या निर्धाराने तिने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

50 किमी अंतर पार करत पोहोचली परीक्षा केंद्रावर 

हागदळ-गुगदळ ते जळकोट हे सुमारे 50 किलोमीटर अंतर पार करत ती वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचली. डोळ्यांत अश्रू होते, पण मनात वडिलांची प्रेरणा. तिने गणिताचा पेपर शांतपणे लिहिला. तिच्यासाठी हा केवळ एक विषय नव्हता, तर आयुष्याच्या कठीण प्रसंगावर मात करण्याची पहिली पायरी होती. शिवानीची ही जिद्द अनेकांना प्रेरणा देणारी ठरली आहे. दुःख कितीही मोठं असलं, तरी स्वप्नं आणि शिक्षण यांची ज्योत विझू देऊ नये, याचं जिवंत उदाहरण शिवानीने घालून दिलंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Embed widget