लातूर : प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या संशयावरून एका विवाहित महिलेच्या प्रियकराने तिच्याच पतीवर चाकू हल्ला (Latur Crime News) केल्याची धक्कादायक घटना लातुरातील म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघा संशयितांना अटक (Latur Crime News)केली आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.(Latur Crime News)
तक्रारदार दीपक दत्तू खेडे (वय ३७, रा. संत गोरोबा सोसायटी, विवेकानंद चौक, लातूर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अविनाश सूर्यवंशी (वय २२, रा. वलांडी, ता. देवणी, जि. लातूर) याचे सचिन सूर्यवंशी यांची पत्नी भक्ती हिच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रकरणात सचिन अडथळा ठरत असल्यामुळे अविनाशने त्याला ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार शुक्रवारी रात्री म्हाडा कॉलनीतील कमानीनजीक बाभळगाव रोड परिसरात अविनाशने धारदार चाकूने सचिनच्या तोंडावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात सचिन महादेव सूर्यवंशी (वय २४, रा. म्हाडा कॉलनी, लातूर) गंभीर जखमी झाला. नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी अविनाश नंदकिशोर सूर्यवंशी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक रेडेकर करत आहेत.
Latur Crime News: गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, पतीकडून छळ होत असल्याचे सांगून प्रेयसीने आपल्या प्रियकराला भडकवले, आणि त्यानंतर २१ वर्षीय तरुणाने तिच्या नवऱ्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १०) रात्री सुमारे १० वाजता म्हाडा कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमीच्या मानेवर, छातीत आणि चेहऱ्यावर गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी हल्लेखोर सचिन सूर्यवंशी आणि त्याची प्रेयसी भक्ती यांना ताब्यात घेतले आहे. मजुरी करणारा सचिन महादेव सूर्यवंशी (वय ४०, मुळ रा. देवर्जन, ता. उदगीर) पत्नी भक्ती (वय ३०) आणि दहा महिन्यांच्या मुलीसह महिनाभरापूर्वीच लातूरच्या म्हाडा कॉलनीत राहायला आला होता. मात्र, भक्तीचे तिच्या नात्यातील अविनाश किशोर सूर्यवंशी (वय २१, रा. वलांडी, ता. देवणी) याच्यासोबत गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
Latur Crime News: मानेवर, चेहऱ्यावरआणि छातीत गंभीर वार
या दोघांमध्ये सतत भेटीगाठी, बोलणं सुरू होतं. ही बाब सचिनच्या लक्षात आल्यानंतर तो कामानिमित्त बाहेर जाताना पत्नीला घरात बंद करून जात असे. त्यामुळे वैतागलेल्या भक्तीने अविनाशला ‘पती छळ करतो’ असं कारण सांगून त्याला हल्ला करण्यास प्रवृत्त केले. शुक्रवारी रात्री अविनाशने म्हाडा कॉलनी गेटवर सचिनवर धारदार कत्तीनं सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात सचिन कोसळला. मानेवर, चेहऱ्यावरआणि छातीत गंभीर वार झाल्यामुळे त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
Latur Crime News: तो गावाकडे आला अन्....
बीफार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेलेला अविनाश काही दिवसांपासून भक्तीला भेटण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी त्याने आई-वडिलांना “पोटदुखीचा त्रास होत आहे” असा बहाणा सांगितला. त्यावर पालकांनी “गावाकडे ये, डॉक्टरांना दाखवू” असं सांगितल्याने तो गावाकडे, वलांडी येथे परतला. तिथे तो तब्बल पाच-सहा दिवस मुक्कामी थांबला. यानंतर त्याने आपल्या तीन मित्रांना लातूरपर्यंत दुचाकीवर सोडण्यासाठी सांगितलं. या प्रवासादरम्यानच त्याने म्हाडा कॉलनीत हल्ला केला आणि पुन्हा रात्री वलांडीला परतला. दरम्यान, रात्री सुमारे १० वाजता विवेकानंद चौक पोलिसांना फोन आला की, एक व्यक्ती रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीची ओळख पटवली आणि त्याच्या पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ती सतत अडखळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पुढील तपासात तिने अखेर आरोपी अविनाश सूर्यवंशीचे नाव कबूल केले.
Latur Crime News: दोघांमध्ये वारंवार वाद होत होते
भक्ती आणि अविनाश यांच्यात मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या संबंधांची माहिती पती सचिनला मिळाल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सचिन मजुरीसाठी बाहेर जाताना पत्नी भक्तीला घरात बंद करून बाहेरून कडी लावत असे, ज्यामुळे भक्ती वैतागली होती. त्यामुळेच तिने आपल्या प्रियकर अविनाशकडे पती सतत छळ करतो त्यामुळे त्याचं काहीतर कर अशी मागणी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Latur Crime News: भक्तीपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान
दोन्ही आरोपी नात्यातीलच असून त्यांच्यात सुमारे सहा वर्षांपासून संबंध होते. अविनाश बीफार्मसीचे शिक्षण घेत असून तो भक्तीपेक्षा तब्बल नऊ वर्षांनी लहान आहे. भक्तीचे पहिले लग्न झाले होते, परंतु काही दिवसांतच ते मोडले. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी तिचे दुसरे लग्न देवर्जन येथील सचिन महादेव सूर्यवंशी (वय ४०) यांच्याशी झाले. सचिनची पहिली पत्नी निधन पावली होती आणि त्याला एका मुलीचा जन्म झाला होता. सध्या ती मुलगी केवळ १० महिन्यांची आहे. पतीच्या संशयी स्वभावामुळे घरात वाद वाढले आणि अखेरीस या कटातून रक्तरंजित घटना घडल्याचे समोर आले आहे.