लातूर : लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन विभागात तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार रुपयांच्या अपहाराचा (Latur Crime News) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना पोलिसांनी ताब्यात (Latur Crime News) घेतले आहे. एक आरोपी फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात राहुल गोविंदराव वागदरे, ब्रिजकिशोर ठाकूर, दत्तात्रय शिरसागर आणि श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत वेतन विभागातील इंटेन्सिव्ह, बेसिक एरर, स्पेशल पे, रेफरन्स अलाउन्स आदी वेतन शीर्षांमध्ये खडाखोड करून शासकीय रक्कम स्वतःच्या खात्यावर वळविल्याचा आरोप आहे. (Latur Crime News)
Latur Crime News: ३६८ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त रक्कम
प्राथमिक चौकशीत आरोपींनी संगनमत करून बनावट दस्तऐवजांच्या आधारे ३६८ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून अतिरिक्त रक्कम काढल्याचे समोर आले आहे. तपासात राहुल वागदरे यांनी सुमारे ९० लाख ५७ हजार, ब्रिजकिशोर ठाकूर यांनी १ कोटी २३ लाख ३६ हजार, तर दत्तात्रय शिरसागर यांनी ४८ लाख ९८ हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. २०१५ पासून २०२५ पर्यंत सुरू असलेला हा प्रकार लेखापरीक्षणात का आढळला नाही? ३६८ कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा होत असताना याबाबत तक्रार का झाली नाही? तसेच अतिरिक्त रक्कम परत करताना ती शासकीय खात्यात न जाता आरोपींच्या खात्यातच का जमा करण्यात आली, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.(Latur Crime News)
या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक, लातूर यांच्याकडे देण्यात आला असून, वरिष्ठ स्तरावरूनही या घोटाळ्याची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. या संदर्भात माहिती समोर आल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून पुढील तपासाच्या सूचना देण्यात आल्याची माहिती लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिली.(Latur Crime News)
Latur Crime News: नेमकं काय घडलं?
लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वेतन वितरण प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक अनियमिततेप्रकरणी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली असून, चार जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना लातूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मे २०१५ ते मार्च २०२५ या काळात हा घोटाळा झाला. आरोपींनी वेतन अभिलेखात खाडाखोड केली. बनावट दस्तऐवज तयार केले. प्रोत्साहन भत्ता, मूळ वेतन थकबाकी, विशेष वेतन व इतर वेतन शीर्षकाखाली अधिकची रक्कम काढली जात असल्याचे समोर आले.
Latur Crime News: गुन्हे दाखल, तीन आरोपींना अटक
उदगीर डीवायएसपी गजानन भातलवंडे यांनी चौकशी केली. त्यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात राहुल गोविंदराव वागदरे (लिपिक), ब्रिजकिशोर ठाकूर (लिपिक), दत्तात्रय मारुती क्षीरसागर (लिपिक) आणि अजय दिगंबर सूर्यवंशी (श्रेणी पोलिस उपनिरीक्षक) यांच्यावर गुन्हा नोंद केला. यांतील तीन आरोपींना अटक केली.
चौघा आरोपींनी शासकीय तिजोरीतून जास्तीची रक्कम अदा करून घेतली आणि ती रक्कम स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर वळवून घेतली. प्राथमिक चौकशीत ही रक्कम २ कोटी ३८ लाख ९२ हजार ७ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. हा वेतन घोटाळा तब्बल दहा वर्षांनंतर उघड झाला आहे. या घोटाळ्याने लातूर जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
