एक्स्प्लोर

Latur Accident : अंगणात खेळणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीला ट्रॅक्टरने चिरडले, लातूरमधील घटना, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

Latur Accident : गावातील शिवारातून मातीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ये जा करत होते. त्याचवेळी लहान गल्ली असलेल्या रस्त्यावर एक भरधाव ट्रॅक्टर आला आणि त्याने चिमुरडीचा जीव घेतला. 

लातूर: गावातून मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अंगणात खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. उदगीर तालुक्यातील अवलकोंडा या गावात रविवारी ही घटना घडली. मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. शिवकन्या खेळकर असं त्या मुलीचं नाव आहे. या घटनेतील ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा या गावातील शिवकन्या खेळकर ही तिच्या अंगणात खेळत होती. दरम्यान गावाच्या शिवरावातून ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती वाहतुकीचे काम सुरू होतं. गावातील लहान गल्ली असलेल्या रस्त्यांवरून मातीने भरलेले ट्रॅक्टर नेले जात आहेत. त्याच वेळी घराच्या बाहेर अंगणातील रस्त्यावर खेळणारी शिवकन्या मातीने भरलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. 

Latur Accident : ट्रॅक्टर चालक फरार 

गावात वस्तीमध्ये ट्रॅक्टर चालकाने भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवल्याने रस्त्यावर खेळणाऱ्या शिवकन्याचा चिरडून जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक गौस बागवान हा फरार झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या वाढली

महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2024 मध्ये एकाच वर्षात अपघातात मृत्यू झालेल्यांची संख्या 15 हजारांहून अधिक आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रात रोज 42 अपघाती मृत्यू होत असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली होती. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील अपघात 19 टक्क्यांनी वाढले आहेत, तर समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या 4 टक्क्यांनी घटली आहे अशी माहिती महामार्ग पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. नऊ जिल्हे आणि शहरांमध्ये मृत्यूंमध्ये 10 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात अपघाती मृत्यूंमध्ये सर्वाधिक 25 टक्के वाढ झाल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Latur Crime News: चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना
चुलतीने 6 वर्षांच्या पुतण्याला संपवलं; पडक्या घराजवळ मृतदेह आढळला, लातूरमधील हादरवणारी घटना
Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 
जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget