Latur Accident News :लातूर जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. उदगीर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर एकूरकाजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना कळविले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उदगीर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.मृत व्यक्तीची ओळख अद्याप समोर आलेली नाही, पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुंबई गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी बसला कारची धडक, पाच जण गंभीर जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड मधील भरणे नाका या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गालगत उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी बसला मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरदा वेगाने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारची पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की पाठीमागून लक्झरी बसला धडक देणाऱ्या स्विफ्ट कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. याबद्दल स्विफ्ट कार मधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्विफ्ट गाडीमध्ये अडकलेल्या या प्रवाशांना तब्बल अथक प्रयत्नानंतर पोलीस व स्थानिकांच्या मदतीनंतर सुरक्षित बाहेर काढून कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या यातील जखमी झालेल्या प्रवाशांची स्थिती सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान खेड मधील जगबुडी नदी परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे वाहनचालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.