लातूर : निसर्गाच्या अवकृपेने एका गरीब शेतमजूर कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसादरम्यान वीज पडून मृत्युमुखी पडला. ऐन पेरणीच्या हंगामात शेतीसाठीचा एकमेव आधार गमावल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत गायकवाड यांच्या पत्नीने पुढाकार घेत थेट जू आपल्या खांद्यावर घेतले आणि शेतीची कामे सुरू ठेवण्याचा (Devendra Fadnavis Helps Latur Farmer) प्रयत्न केला. काशिनाथ गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर असून इतरांची शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात दोन मुलगे आणि चार मुली असून सहा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. बैलाच्या मृत्यूनंतर शेतीची मशागत आणि दैनंदिन उत्पन्नाचे गणित पूर्णपणे कोलमडल्याने कुटुंब चिंतेत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल झाल्यानंतर लातूरच्या शेतकऱ्याच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावले.शेतकऱ्यानं बैल नसल्यानं पत्नीला नांगराला जुंपल्याचं विदारक दृश्य समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला बैल उपलब्ध करुन दिला. स्थानिक गोशाळेतून शेतकऱ्याला बैल दिला असल्याची माहिती समोर आली आहे.(Devendra Fadnavis Helps Latur Farmer)
Devendra Fadnavis Latur: मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता
लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने आपल्या पत्नीला दुसऱ्या बैलाच्या जागी जुंपल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भात तातडीने लातूर जिल्हाधिकारी यांना लक्ष घालण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक गोशाळेतून बैल त्या शेतकऱ्याला दिला. थेट मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याने त्या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केल्याची माहिती आहे.
Devendra Fadnavis Latur: वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला अन्...
५ जून रोजी झालेल्या वादळी पावसात वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतीची कामे थांबू नयेत म्हणून गायकवाड यांच्या पत्नीने स्वतः जू खांद्यावर घेतल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली असून संबंधित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागात आजही अनेक अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने शेती करतात. त्यामुळे अशा कुटुंबांसाठी बैल हे केवळ पशुधन नसून उपजीविकेचे महत्त्वाचे साधन असते. गायकवाड कुटुंबाच्या बाबतीतही एका बैलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबाचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Latur Farmer Gets Bull : आर्थिक मदतही मिळाली
प्रशासनाचा तडकाफडकी निर्णय शेतकरी काशिनाथ गायकवाड यांना काल आर्थिक मदत देण्यात आली. आज सकाळी बांधावर नेऊन बैल देण्यात आला. त्यानंतर मशागतीच्या कामाला सुरुवात केली. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा वीज कोसळून एक बैल दगावल्याने पत्नीला नांगराला जुंपून शेतीची मशागत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेची दखल घेत प्रशासनाने तातडीने मदतीची पावले उचलली आहेत. देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी काल गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत तत्काळ ३२ हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. तसेच गोशाळेतून एक बैल उपलब्ध करून देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला होता.
प्रशासनाने कोणताही गाजावाजा न करता आज सकाळी गोशाळेतून एक बैल आणून थेट गायकवाड यांच्या शेतात पोहोचवला. त्यामुळे शेतीच्या कामासाठी उभा राहिलेला मोठा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर प्रशासनाने अवघ्या एका दिवसात आर्थिक मदत आणि बैल उपलब्ध करून दिल्याने गायकवाड कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाची तात्काळ आर्थिक मदत 32 हजार रुपये दिली. तर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हक्क फाउंडेशन कडून वीस हजार रुपये दिले. आज सकाळी प्रशासनाकडून बांधावर सात वाजता येऊन बैल देण्यात आला.
