Latur Crime News : ड्रग्जचा विषय काही केला संपेना, मुंबईतून लातूरमध्ये ड्रग्जचा पुरवठा; गावठी पिस्तूलसह मोठं घबाड पोलिसांची हाती
Latur Crime News : लातूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची मोठी कारवाई करत आठ लाखाचे ड्रग्ज जप्त केलं असून गावठी पिस्तूलसह दोन जणांना अटक केली आहे. तर एक जण फरार आहे.

Latur Crime News : लातूर शहरात मागील काही महिन्यांपासून सातत्याने ड्रग्ज विरोधात कारवाई होत असल्याचे समोर आलं आहे. अशातच काल (10 जुलै)रात्रीच्या सुमारास लातूर पोलिसांनी शहरात मोठी कारवाई केली आहे. यात आठ लाखाचे ड्रग्ज पोलिसांच्या हाती लागले असून दोन जण अटकेत आहे. तर एक जण फरार झाला आहे. या कारवाईत गावठी पिस्तूलही ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून ड्रग्जचा विषय पुन्हा एकदा नव्याने जिल्ह्यात चर्चेत आला आहे.
गावठी पिस्तूलसह 78 ग्रॅम एमडीए ड्रग्ज जप्त
पुढे आलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचला होता. मुंबई आणि पुणे या भागातून ड्रग लातूरात आणून विक्री करण्याचा प्रयास करणारे येत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यावरून एलआयसी कॉलनी भागातील एका घरात पोलिसांनी छापा टाकला असता दोन आरोपी आढळून आले, तर एक फरार झाला आहे. स्थानिक गुन्ह अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत लातूर येथील 26 वर्षीय तरुण गणेश अर्जुन शेंडगे आणि दहिसर मुंबई येथील रणजीत तुकाराम जाधव या 24 वर्षे तरुणांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 78 ग्रॅम एमडीए ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. याचे बाजारातील मूल्य आठ लाखाच्या आसपास आहे. याच आरोपीकडून एक गावठी पिस्तूल ही जप्त करण्यात आली आहे.
ड्रग्स पुरवठा करणारा मुंबईचा तरुण हा लातूरला येण्यापूर्वी कोणकोणत्या ठिकाणी ड्रग्जचा पुरवठा करत आला आहे, याची माहिती पोलीस घेत आहेत. मुंबईतून ड्रग्स कुठून खरेदी करतो त्याच्या पाठीमागे कोण आहेत? लातूरमध्ये किती लोकांना ड्रग्स पुरवठा केला जातो? इत्यादि अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. मात्र पुण्या-मुंबईतील पावसाचे लोण आता लातूर शहरातही फोफावत असल्याचे नव्याने समोर आलं आहे.
ड्रग्जचा विषय काही केला संपेना, महिन्याभरपूर्वी मोठी कारवाई
यावर्षी एप्रिल महिन्यात लातूर जिल्ह्यातील रोहिना येथे ड्रग्ज बनवणाऱ्या यंत्रणेवरच पोलिसांनी कारवाई केली होती. यात कोट्यावधीचा ड्रग्स आढळून आले होते. त्यानंतर काही दिवसांनी लातूर शहरात ड्रग्सची विक्री करणारे पती-पत्नी ही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हे दोन विषय सुरू असतानाच आता पोलिसांनी केलेली ही कारवाई आहे. ड्रग्ज विक्रीचे रॅकेट लातूरमध्ये खोलवर रुजल्याच यातून दिसून येतंय.
इतर महत्वाच्या बातम्या
























