Nagpur News: पतंजलीच्या (Patanjali) आशियात खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्कचे उद्घाटन येत्या 9 मार्च रोजी नागपुरातील मिहान सेझ (SEZ) मध्ये पार पडणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) तसेच पतंजली समूहाचे प्रमुख योगगुरू रामदेव बाबा (Yogaguru Swami Ramdev) आणि आचार्य बाळकृष्ण हे उपस्थित राहणार आहेत.
1000 पेक्षा जास्त कोटींची गुंतवणूक, आठ वर्षानंतर मुहूर्त
विशेष म्हणजे तब्बल आठ वर्षानंतर हे फूड व हर्बल पार्क अस्तित्वात येत आहे. 10 सप्टेंबर 2016 रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत झाले होते. तेव्हा 1000 पेक्षा जास्त कोटींच्या गुंतवणुकीतून विदर्भातील हजारो युवकांना प्रत्यक्ष रोजगार देण्याची घोषणा योग गुरु रामदेव बाबा यांनी केली होती. मात्र भूमिपूजनाच्या अनेक वर्षानंतरही या प्रकल्पाशी संबंधित कोणतेही बांधकाम झाले नव्हते. त्यामुळे मिहानमधील शेकडो एकर जमीन तशीच पडून होती. त्यामुळे या प्रकल्पासंदर्भात आणि योगगुरु रामदेव बाबा यांच्या हेतू संदर्भात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. तर अनेकांनी या प्रस्तावित प्रकल्पाला विरोध ही दर्शवला होता. आता अनेक वर्षांच्या दिरंगाईनंतर का होईना हे प्रकल्प प्रत्यक्षात अस्तित्वात येत आहे.
आशियात खंडातील सर्वात मोठ्या फूड आणि हर्बल पार्क
पतंजली नागपुरातील मिहान सेजमध्ये उभारणारे हे फूड व हर्बल पार्क आशियातील सर्वात मोठा फूड व हर्बल पार्क आहे.
या पार्कसाठी तब्बल 1000 कोटींच्या गुंतवणूकीतून उभे राहणारे हे फूड व हर्बल पार्क आहे.
मिहानमध्ये तब्बल 264 एकर जमीन पतंजली समूहाने अनेक वर्षांपूर्वी घेतली आहे.
फूड व हर्बलपार्क मधील उत्पादनांसाठी स्थानिक शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी केला जाईल.
फूड व हर्बल पार्कमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हजारो स्थानिक तरुणांना रोजगार मिळण्याचा दावा करण्यात आला आहे.
तर विदर्भाच्या अनुषंगाने रोजगार निर्मितीसाठी या पार्कला विशेष महत्व प्राप्त झाले असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या