Eknath Shinde received a call from Omraje nimbalkar: पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणाचा निकाल विरोधात गेल्यानंतर, आपण एकनाथ शिंदे गटात जाणार की नाही हे अद्याप ठरवले नसल्याचे ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी ते शिंदे गटात जाणार असल्याची दाट चर्चा होती, मात्र आता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच ते आपला पुढील राजकीय निर्णय घेतील. या खटल्याचा निकाल आणि आपला राजकीय निर्णय यांचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, केंद्रीय गृह सहकार मंत्री अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासमवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत. निकाल येताच ओमराजे यांनी एकनाथ शिंदे यांना फोनाफोनी केल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे अमित शाह यांच्या बाजूलाच व्यासपीठावर होते. त्याचवेळी ओमराजेंच्या फोनची रिंग शिदेंच्या फोनवर वाजली. यावेळी ताडकून बाजूला जात ओमराजे यांचा फोन घेत शिंदे यांनी चर्चा केली. दुसरीकडे 20 वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढाईनंतर आरोपी पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता झाल्याने ओमराजेंना मोठा धक्का बसला आहे. कोर्टाने राजकीय वैमनस्य असल्याचे मान्य केले असूनही सर्व आरोपींची मुक्तता झाली, मग हत्या कोणी केली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. न्यायव्यवस्थेचे हे मोठे दुर्दैव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची चर्चा
पोलिसांवर दबाव असल्याने त्यांच्या तपासात त्रुटी राहिल्याचे ओमराजे यांनी म्हटलं आहे. आता या खटल्याचा पूर्ण निकाल वाचून सीबीआय काय निर्णय घेते आणि वरिष्ठ न्यायालयाकडून न्याय मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, निकालाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा केली. याप्रकरणी सीबीआयने वरिष्ठ न्यायालयात जाण्यासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
गेली 20 वर्षे भरून निघणार नसली तरी
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, ओमराजे यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून पक्षशिस्तीचा भंग केला आहे. मात्र, ओमराजे यांचा शिंदे गटाकडून विश्वासघात झाला असून, जर त्यांना पुन्हा ठाकरे गटासोबत यायचे असेल, तर त्यावर निर्णय घेण्यास उद्धव ठाकरे सक्षम आहेत, असे देसाई म्हणाले. दरम्यान, या निकालामुळे पद्मसिंह पाटील निर्दोष सुटले असून, गेली 20 वर्षे भरून निघणार नसली तरी आज समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या सून अर्चना पाटील यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
