कोल्हापूर : मुंबईमध्ये मला अरबी समुद्र पहायला मिळाला आणि वारणेमध्ये महिलांचा महासागर बघायला मिळाल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वारणा उद्योग समूहाच्या विविध कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. यावेळी बोलताना फडणवीस यांनी वारणा उद्योग समूहाचे कौतुक करतानाच आमदार विनय कोरे यांच्यावर जोरदार स्तुस्तीसुमने उधळली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच यांनी महायुतीमधून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार जागांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आमदार विनय कोरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. 









विनय कोरे म्हणजे अतिशय शांतीत क्रांती करणारे व्यक्तीमत्व


देवेंद्र फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले की, तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळायला हवा होता. सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस करणार आहे. भारताच्या राष्ट्रपती वारणा भूमीत  कार्यक्रमास आल्या आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. ते पुढे म्हणाले की, वारणेत थक्क करणारी क्रांती झाली आहे. विनय कोरे म्हणजे अतिशय शांतीत क्रांती करणारे व्यक्तीमत्व आहे.






ते पुढे म्हणाले की, पीएम मोदींकडून प्रेरणा घेवून आमचं सरकार महाराष्ट्रात महिलांसाठी विविध योजना राबवत असल्याचे फडणवीस म्हणाले. महिला एवढा प्रवास करत आहेत की,तोट्यातील एसटी फायद्यात आल्याचे त्यांनी सांगितले, उद्याच्या काळात भारताच नेतृत्व नारीशक्ती करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 






इतर महत्वाच्या बातम्या