Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
Sharad Pawar : शरद पवार यांनी कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सातत्यानं ऊस घेतल्याचा परिणाम दिसल्याचं म्हटलं. यावेळी जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

Sharad Pawar कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दत्ताजीराव कदम शिरदवाड विकास सेवा सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. या कार्यक्रमात शरद पवार यांनी ऊस शेती संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं. आज रस्त्याने येताना ऊस दिसला, सातत्याने ऊस पिक घेतल्याचे परिणाम दिसले.यामध्ये आता दुरुस्ती करण्याची गरज आहे. सातत्याने ऊस पिकाखाली आलेल्या जमिनी नापीक कशा होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
सहकारात कोल्हापूरचं स्थान अग्रस्थानी
दत्ताजीराव कदम शिरदवाड विकास सेवा सोसायटी या एका संस्थेची स्थापन 1926 ला झाली. आणि या संस्थेच रोपट गेली शंभर वर्ष या भागातील लोकांना ताकद देत आहे. सहकारी चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याच स्थान अग्रस्थानी आहे. महाराष्ट्रभर सहाकराच जाळ मेहता यांनी तयार केलं. इचलकरंजी आणि कोल्हापूर या भागांन सहकारातून नेतृत्व दिले, असं शरद पवार म्हणाले.
सातत्यानं ऊस घेतल्याचे परिणाम दिसले
रस्त्याने येताना ऊस दिसतो, जमिनी भारी आहेत. सातत्याने उसाचं पिक घेतल्याचे परिणाम दिसले. यामध्ये आता दुरुस्ती करण्याची गरज आहे. आज दत्त सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्त्व ज्यांच्याकडे आहेत त्यांनी या जमिनी नापीक कशा होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे. वडीलधाऱ्यांनी दत्त शिरोळचं जे रोपटं त्या काळात लावलं चांगलं चालेल कसं याची काळजी सध्या घेतली जातात.
महाराष्ट्रात या भागात अनेकांनी काम केलं. मगाशी मी नाव धनंजयराव गाडगीळ यांचं नाव घेतलं. नंतरच्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा दूरदृष्टीचा नेता राज्याला लाभाला. वसंतदादा पाटील, रत्नापा कुंभार, यड्रावकर असतील यांनी या क्षेत्राला जबरदस्त शक्ती देण्याचं काम केलं.
आज सहकारी सोसायट्यांपासून राज्य बँकेपर्यंत अनेक संस्था आपल्याकडे आहेत. आनंद या गोष्टींचा होतो, या सगळ्या संस्थांना चांगल्या विचारांच्या माळेमध्ये गुंफण्यांचं काम महाराष्ट्र राज्य सहकारी बँक देशाची मोठी बँक आहे. ही कारखानदारी आहे, त्या कारखानदारीनं निव्वळ महाराष्ट्र नाही, तर सगळ्या देशामध्ये कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार असेल या सगळ्या भागात कारखानदारी सरकारच्या माध्यमातून उभी करुन त्याला ताकद आणि योग्य विचार द्यायचं काम या भागातील नेतृत्त्वानं केलं हे आपण विसरु शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.
महाराष्ट्रातील साखर कारखानदारीने देशाला चांगला विचार देण्याचं काम केलं आहे. कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीमध्ये दत्ताजीराव कदम यांचे नाव घेतलं नाही तर ती यादी कधीच पूर्ण होणार नाही. दत्ताजीराव कदम गेले त्या दिवशी या जिल्ह्यातच होतो. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून आलो आणि त्यांना खांदा द्यायला आलो होतो, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
Before You Go
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले






















