Shahu Maharaj on Maratha Reservation: कोल्हापुरात आज मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा एकदा सुरू झाला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज (1 ऑक्टोबर) खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन आणि तलवारीचे पूजन करण्यात आले. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र, सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याची खंत व्यक्त केली. मराठा आरक्षणाची गरज असून आज शस्त्र पूजन करत केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठा समाजाला आरक्षणाची गरज यात शंका नाही (Shahu Maharaj Reservation Demand)
यावेळी बोलताना शाहू महाराज म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या वळणावर नेत आहे. आतापर्यंत पुष्कळ प्रयत्न झाले आहेत, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या शासनाबरोबर दोन भेटी झाल्या आहेत. प्रत्यक्षात मराठा समाजाला काय मिळालं आणि किती मिळालं याचा अंदाज लागलेला नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे यात शंका राहिलेली नाही. आज खंडेनवमीच्या निमित्ताने राज्यघटना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 मध्ये काढलेल्या आदेश प्रमाण मानून यापुढे मराठा आरक्षणाचा लढा करायचा आहे. यासाठीच सातत्याने प्रयत्न करायचे आहेत. मराठा समाज हा मोठा समाज आहे यामुळे त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, असे ते म्हणाले.
धनगर आरक्षणावर काय म्हणाले? (Shahu Maharaj on Dhangar Reservation)
शाहू महाराज यांनी सांगितले की, धनगर आरक्षणाची कॅटेगरी बदलावी अशी मागणी आहे. मात्र, धनगर आरक्षणातही तोडगा निघाला असं मी समजत नाही.
दिल्लीत अजूनही घर मिळालेलं नाही (Shahu Maharaj on house in delhi)
दरम्यान, दिल्लीमधील निवासास्थानाबद्दल खंत नव्हे, तर मी वस्तुस्थिती सांगितली असल्याचे त्यांनी सांगितलं. खासदार होऊन दीड वर्ष झालं. मात्र, अजूनही कायमस्वरूपी घर मिळालं नसल्याचे ते म्हणाले. दिल्लीत जुनी निवासस्थानं देऊ केली होती. मात्र, ती गैरसोयीची होती. आता तरी चांगलं घर मिळावं अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या