एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जायंट किलर अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लाॅटरी'

रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली. या निवडीमुळे कोल्हापूरच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत रूपाराणी निकम यांना 46 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना 35 मते मिळाली. त्यामुळे बहुमताच्या जोरावर रूपाराणी निकम यांची महापौरपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

जनसुराज्यचे अक्षय जरग उपमहापौर

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांनी काँग्रेसचे दुर्वास परशुराम कदम यांचा पराभव केला. या निवडणुकीत जरग यांना 46 तर कदम यांना 35 मते मिळाली. रुपाराणी निकम आणि अक्षय जरग यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी चार दिवसांपूर्वी निकम यांच्या नावाची घोषणा केली होती. दुसरीकडे,  कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती. त्यामुळे महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र, भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला. 

कोण आहेत रुपाराणी निकम?

रुपाराणी निकम या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवताना काँग्रेसचे माजी नगरसेवक भुपाल शेटे यांचा पराभव केला होता. भुपाल शेटे यांचा पराभव आमदार सतेज पाटील यांनाही चटका लावणारा होता. रुपाराणी निकम या महाडिक गटाच्या निकटवर्तीय आहेत. उच्चशिक्षित ही त्यांच्या जमेची बाजू आहे. 

कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काठावरचं बहुमत मिळालं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते तथा कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यात थेट लढत होती. मात्र, पाटील यांनी एकहाती मैदान मारताना तब्बल 34 जागा निवडून आणल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाला केवळ एक जागा मिळाल्याने केवळ 6 जागांमुळे कोल्हापूरची महापालिका सतेज पाटील यांच्या हातून निसटली. कोल्हापूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.  काँग्रेसच्या खात्यामध्ये 34 जागा आहेत. भाजपच्या खात्यामध्ये 26 जागा आहेत. शिवसेना शिंदे गट 15 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली. कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाटी कोरी राहिली. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 34 उमेदवार विजयी झाले. शिवसेना ठाकरे गटाचा केवळ एक उमेदवार विजयी झाला.  दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला.  

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर
AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
India vs New Zealand, Final T20 World Cup: 'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
'अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्तीला बाहेर ठेवा' वर्ल्डकप फायनलला काही तास बाकी असतानाच गंभीर गुरुजी अन् कॅप्टन सूर्याला थेट सल्ला!
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
डोंबिवलीच्या महिलांचा वर्ल्ड रेकॉर्ड; सांगलीचा विश्वविक्रम मोडला, महिला दिनी 9,111 विद्यार्थीनींची एकत्र लेझीम
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
इराक लक्षात ठेवा! खोटारट्यावर आधारित युद्ध नकोत; थेट इराणवरील अमेरिका-इस्रायली हल्ल्यांविरोधात व्हाईट हाऊससमोर एल्गार
Embed widget