Raju Shetti Warns Sugar Millers Over FRP Dues : कोल्हापूर जिल्ह्यातील  एफआरपीचे 137 कोटी (Raju Shetti on FRP dues) थकीत आहेत. याचे कारण म्हणजे साखर कारखानदार यानी मागील हंगामाचा विचार न करता अंदाजे FRP दिली आहे. साखरेचे टेंडर्स सध्या  4500 दराने सुरू आहेत. त्यामुळे साखर कारखानदारांनी इमानदारीने एफआरपीवरती पैसे द्यावेत, आम्ही 15 टक्के व्याजासह हे पैसे  घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. जास्तीत जास्त काटा मारून रिकव्हरी चोरण्याचे काम प्रत्येक साखर कारखानदार करत असल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. 

Continues below advertisement

त्या शेतकऱ्यांचे उसाचे क्षेत्र इतके मोठे आहे का?  

राजू शेट्टी म्हणाले की, काही कारखान्यांनी शेवटच्या दोन आठवड्यातील बिल (sugarcane farmer payment) अद्याप दिलेलं नाही. त्यामुळे ही थकबाकी राहिले आहे. नुकतीच आम्ही साखर आयुक्तांची भेट घेऊन हे पैसे आम्हाला व्याजा सकट मिळायला पाहिजेत, अशी मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. साखर कारखान्याकडून हे पैसे मिळाले नाही तर त्यांच्यावर RRC अंतर्गत कारवाई करावी अशी आमची स्पष्ट मागणी असल्याचे ते म्हणाले.  जास्तीत जास्त काटा मारून रिकव्हरी चोरण्याचे काम  प्रत्येक साखर कारखानदार करत आहे.

यांच्या मागे इन्कम टॅक्स लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाही

पुढील आठवड्यात मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भेटून प्रत्येक कारखान्याकडे 500 टनापेक्षा जास्त ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागून घेणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. खरोखरच त्या शेतकऱ्याचे ऊसाचे क्षेत्र इतके मोठे आहे का? हे तपासण्यास सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित शेतकऱ्यांचे जमिनीचे क्षेत्र 500 टनापेक्षा जास्त नसेल तर त्याने साखर कारखान्याला दिलेला ऊस कुठून आणला? त्यांनी घातलेला ऊस काटा मारलेला आहे का? हे तपासता येणार आहे. असा जर प्रकार असेल तर हे मनी लाँड्रिंग (money laundering in sugar industry) आहे. त्यामुळे यांच्या मागे इन्कम टॅक्स लावल्याशिवाय (income tax on sugar mill owner) मी गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या