Gokul Election: गोकुळ दूध संघामध्ये सत्ता मिळवून तुम्हाला तो अमूल आणि गुजरातच्या घशामध्ये घालायचा असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. गोकुळवर एकीकडून कर्नाटकच्या नंदिनीचे आणि गुजरातकडून अमूलने आक्रमण करायला सुरुवात केली आहे. मात्र, गुजरातला जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यांमध्ये नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गोकुळ गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का?
त्यामुळे शेतकऱ्यांचा हा गोकुळ संघ गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला. त्या विरोधात सतेज पाटील यांनी समविचारी आघाडी स्थापन केली. या आघाडीच्या कार्यक्रमांमध्ये राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. सत्ताधारी आघाडीतून राजू शेट्टी यांनी गोकुळसोरचा धोका बोलून दाखवला. गोकुळला अमूलच्या ताब्यात देण्याचा डाव असल्याचं म्हटलं. जो प्रशासक आणला त्याचाच भाग होता असेही राजू शेट्टी म्हणाले.
गोकुळ आपला कोल्हापूरचा
अमूलचा मुद्दा गोकुळच्या सत्ताधाऱ्यांचे ठराव दाखल करताना दिसून आला. राजू शेट्टींनी विरोधकांची लढाई फक्त आपल्या गोकुळला अमूल ताब्यात देण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. माजी आमदार राजू आवळेंनी सुद्धा यांनी या मुद्द्याला हात घातला. सतेज पाटील यांनी गोकुळ आपला कोल्हापूरचा असल्याचं म्हटलं. उमेदवाराचा निर्णय कोल्हापूरमध्ये झाला पाहिजे का मुंबईमध्ये? ही लढाई कोल्हापूरच्या मातीची आहे, ही लढाई कोल्हापूरच्या स्वाभीमानाच्या आणि अस्मितेची असल्याचं ते म्हणाले. एका बाजूला महायुतीची पैशाची सत्ता दुसऱ्या बाजूला आहे, 5-5 किलोपर्यंत वजन म्हणजे पाच पाच लाख टाकायची ताकद असल्याचे आणि दुसऱ्या बाजूला 14 रुपये दर देणारा बंटी पाटील आहे. दुसऱ्या बाजूला दुधाला, म्हशीला आणि गाईच्या दुधाला न्याय देणारी आमची आघाडी असल्याचे ते म्हणाले.
गोकुळच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः रण पेटलं
दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीमध्ये अक्षरशः रण पेटलं आहे. महायुतीकडून कोणत्याही परिस्थितीत गोकुळ ताब्यात घ्यायचा यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व वापरलं जात असल्याचं आपण बघतोय. अत्यंत शक्ती प्रदर्शनाने महायुतीकडून ठराव दाखल करण्यात आलेत. आपण बघितलं तर हसन मुश्रीफ गटाने 2 हजार 65, शिंदे गटाने 1 हजार 512, भाजप आणि महाडिक गटाने 1,431, कोरे गटाने 545 ठराव दाखल केले आहेत; सत्ताधारी सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने 1,851 ठराव दाखल केले आहेत. त्यामुळे आता हे ठराव एकत्रित केले तर 7,404 होत आहेत. मात्र गोकुळ दूध संघाचे पात्र ठरावांची संख्या फक्त 4,448 आहे. त्यामुळे आता हे वाढलेले ठरावधारक नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न पडला आहे.
दुसरीकडे, गोकुळ निवडणुकीवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. गोकुळशी संबंधित 427 दूध संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय विभागीय दुग्ध निबंधकांनी घेतला होता. या निर्णयामुळे संबंधित संस्थांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असल्याने सतेज पाटील गटाशी संबंधित संस्थांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केल्यात.
इतर महत्वाच्या बातम्या
