इथेनॉलचे दर वाढवून मिळाले तर फायदा तुमचाच होणार आहे. साखरेची एमएसपी वाढली तर फायदा तुमचाच होणार आहे. आणि तुमच्यामध्ये दम नाही, तुमच्यात हिम्मत नाही लढण्याची म्हणून आम्ही लढतोय, अशा परिस्थितीमध्ये आमच्या आंदोलनाला अपशकुन करण्यासाठी, केंद्र सरकारला खूश करण्यासाठी तुम्ही जर कारखाने चालू करण्याचा प्रयत्न केला, तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. आणि या आंदोलनातनं रिकामं झाल्यानंतर एकेकाची मानगुट धरून त्याचा जाब विचारल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, असा गर्भित इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडून 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीप हंगामाला परवानगी दिल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Continues below advertisement

एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार करावा लागेल

शेट्टी यांनी सांगितले की, या कारखानदारांना सगळं आम्ही आयतं करून द्यायला लागलो आहोत. एमएसपी वाढवून देत आहोत, इथेनॉलची किंमत वाढवून देत आहोत. केंद्र सरकार अडचणीत आलं आहे, त्यांना कसल्याही परिस्थितीत साखर पाहिजे आहे. आणि आमच्या अटी मान्य केल्याशिवाय, इथेनॉलचे दर वाढवल्याशिवाय, साखरेची एमएसपी वाढवल्याशिवाय कारखाने चालूच देऊ देणार नाही अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. अशा वेळी मूक संमती देऊन शेतकऱ्यांच्या मागे राहायचं, का या गद्दारांनी सरकारला खूश करायचं हे ठरवावं लागेल. भविष्यामध्ये या एक-एक गद्दाराचा काटा काढायचा विचार आपल्याला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. 

8 टक्के उसाचं गाळप करून तुम्हाला काय मिळणार?

राजू शेट्टी म्हणाले की, कारखानदारांनी किमान तुमच्या फायद्याचा-तोट्याचा तरी विचार करावा. आज कुठलाही अडसाली असो की कुठलाही ऊस असो, 8 टक्क्यांवर रिकव्हरी लागायला तयार नाही. मी अनेक प्लॉटवर जाऊन रिकव्हऱ्या तपासलेल्या आहेत. मग 8 टक्के उसाचं गाळप करून तुम्हाला काय मिळणार आहे? 10.25 टक्के रिकव्हरीला 6150 रुपये एफआरपी ही तुम्हाला अनिवार्यच आहे, तुम्ही 8 टक्क्याचा ऊस गाळला तरी. म्हणजे टनाला पाठीमागे जवळपास 800 रुपये एफआरपी तुम्हाला अतिरिक्त द्यावी लागणार आहे कोवळा ऊस तोडल्यानंतर. सरासरी रिकव्हरी कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांचाही तोटा होणार आहे. त्यामुळे ज्यांचा ऊस जाणार नाही त्यांनीसुद्धा जाब विचारला पाहिजे. 'तुमच्या धोरणामुळं आमचा जर का उसाचा दर कमी होणार असेल तर आम्ही सहन करणार नाही', हा जाब जे ऊस घालवत नाहीत त्यांनीसुद्धा विचारला पाहिजे, असे ते म्हणाले. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या