Rajaram Sakhar Karkhana: कोल्हापुरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana) आज 41 वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे आमदार अमल महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक ( Mahadeorao Mahadik), भाजपचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांची सत्ता आहे. विरोधात शाहू परिवर्तन पॅनल मध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील गट आहे. मयत सभासदांच्या वारस नोंदणीमध्ये (membership discrimination allegations) भेदभाव केला जात असून सत्ताधारी आपल्या मर्जीतील वारस नोंदी करून घेत असल्याचा आरोप विरोधी गटाने केला. कारखान्याच्या खर्चामध्ये भरमसाठ वाढ होत असून यामुळे कारखाना कर्जाच्या खाईत जात असल्याचा आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने (Rajarshi Shahu Parivartan Aghadi) केला. 

Continues below advertisement

 

चेअरमन आमदार अमल महाडिक यांनी आरोप खोडून काढले (Amal Mahadik on Rajaram Karkhana AGM) 

विरोधकांचे हे दोन्ही प्रमुख मुद्दे कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी खोडून काढले. कारखानाच्या बाबतीत खोटी माहिती पसरवून राजकारण करण्याचे धंदे आता विरोधकांनी बंद करावेत. एका रात्रीत कारखान्याचे सभासद रद्द करून कारखान्याचे खासगीकरण करणाऱ्यांनी आम्हाला विचारू नये, अशा शब्दात चेअरमन अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या समर्थकांना टोला लगावला. दरम्यान, आजची सभा सुरू होण्यापूर्वी विरोधी गटातील सभासदांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. सभा सुरू होताच सत्ताधारी गटाचे सभासद आणि विरोधी गटाच्या सभासदांनी जोरदार घोषणाबाजी ही केली.

Continues below advertisement

गाडी आत घेऊन जाण्यावरून पोलिसांसोबत हुज्जत (Police oppose to karkhana member) 

सभेसाठी कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक सर्व संचालकांसह सभास्थळी दाखल झाले होते, तर आमदार सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते एकत्रितपणे सभेच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी सर्वसाधारण सभेसाठी समांतर सभेसाठी आणलेली गाडी आत घेऊन जाण्यावरून पोलिसांसोबत हुज्जत झाली. सतेज पाटील समर्थकांना गाडीसह आतमध्ये जाण्यास पोलिसांनी मनाई केली. कारखान्याच्या सभेमध्ये बोलण्यासाठी आम्हाला माईक दिला जात नाही, म्हणून स्पीकर्स गाडी घेऊन सभेकडे आलो होतो, असे कार्यकर्त्यानी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या