Bharat Jodo Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिलाच मेळावा कोल्हापूरमध्ये होत आहे. या मेळाव्याला संबोधित करताना बाळासाहेब थोरात यांनी भाजपसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. 


थोरात म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून यात्रा दाखवण्याचा सतेज पाटील यांनी आयडिया काढली. त्यांना जे सुचते ते वेगळे, हटके असतं. एलईडी व्हॅनच्या माध्यमातून राबवत असलेला हा सुंदर उपक्रम आहे. ते पुढे म्हणाले, लाखोंच्या संख्येने, लहान, वयस्कर माणसे या यात्रेत सहभागी होत आहेत. भाजपने राहुल गांधी यांच्या टी शर्टवर टीका केली, पण देशभरातून टीका करणाऱ्यांवर टीका झाली. त्यांनी यात्रा काढण्यामागचा हेतू पहा असे सुचवले. 


काँग्रेसची आतापर्यंत वाटचाल राज्यघटनेनुसार होती, पण 2014 पासून माणूस माणसांपासून दूर नेण्याचा प्रयत्न होत आहे, त्यामुळे ही यात्रा काढून राहुल गांधी पुन्हा माणूस माणसांजवळ आणायचे प्रयत्न करत असल्याचे थोरात म्हणाले. 


कुणाच्या डोक्यात येत नाही ते बंटी पाटील यांच्या डोक्यात येते


यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनीही सतेज पाटील यांच्या संकल्पनेला दाद देत कौतुक केले. कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये गावा गावात यात्रा पोचवत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाकडून बंटी पाटील यांना धन्यवाद देत असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकार जनतेच्या मनात, देशात अशांतता निर्माण केले जात आहे, हे वातावरण बदलण्यासाठी आणि देश पुन्हा एकसंध ठेवण्यासाठी ही यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले.


नरेंद्र मोदी वचनभ्रष्ट झालेत


यावेळी एच. के. पाटील यांनी नरेंद्र मोदी वचनभ्रष्ट झाल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. युवकांना रोजगाराचे आश्वासन दिले मात्र 8 वर्षात 8 कोटींपेक्षा जास्त उद्योग बाहेर गेले. भारत जोडो यात्रा म्हणजे लोकांची मने जोडायची आहेत. दिग्विजय सिंह यांनी जो कार्यक्रम दिला आहे, या यात्रेने देशातील वातावरण आणि इतिहास बदलून जाईल हे निश्चित असल्याचे पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या