कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) एकेक मतासाठी महाविकास आघाडी तसेच भाजपकडून काथ्याकूट सुरु आहे. शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. या सर्व प्रकारावरून जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे (MLA Vinay Kore) यांनी टीका केली आहे.  


हॉटेलमध्ये आमदारांना ठेवल्याच्या बातम्या तसेच कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी उभा केलेली पाहून तसेच बसमध्ये बसवून त्यांना घेऊन जाण्याचा केलेला प्रयत्न टीव्हीवर बघायला मिळणं हे सगळं काही वेदनादायी असल्याचे ते म्हणाले. 
 
ते पुढे म्हणाले की, मतदानापूर्वी मुंबईमध्ये जाऊन नियोजन केलं आहे. जनसुराज्य शक्ती स्वतंत्र विचारधारेचा पक्ष आहे आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने आपली भूमिका पहिल्यांदाच जाहीर केली. मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार आहे आणि एखादी भूमिका एकदा जाहीर केल्यानंतर अशा कितीतरी निवडणुका आल्या तरी आपल्याबद्दल चर्चा व्हावी किंवा आपल्याला अशा पद्धतीने जाऊन कुठेतरी हॉटेलमध्ये थांबायची पाळी यावी हे खरे तर आपल्याला निवडून दिलेल्या तीन लाख मतदारांचा अपमान असे मी मानतो.



एखाद्या वेळेला अशी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सातत्याने आपल्याबद्दल विचार व्हावा, त्याची चर्चा व्हावी हे योग्य असे मला वाटत नाही आणि तीच भूमिका मी प्रत्यक्ष आचरणातून जगायचा प्रयत्न करतो आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघात माझ्या कामाच्या ठिकाणी आहे.


महाविकास आघाडीच्या नेत्यांनी धाडस केलं नाही 


मतदानासाठी कोणी संपर्क केला होता का ? असे विचारले असता ते म्हणाले की, माझे अनेक मित्र आघाडीमध्ये आहेत, पण कदाचित मी हे सांगितलं, तरी कोणाला पटणार नाही, पण माझी एक स्वतःच एक अस व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण केले आहे. विरोधी पक्षाने किंवा महाविकास आघाडीमधील कोणीच मला विचारायचं धाडस केलेलं नाही. कारण, मी काय त्याचे उत्तर देणार आहे आणि माझी भूमिका काय असणार आहे याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे मला कोणी संपर्क साधा करायचा प्रयत्न केलेला नाही, असे ते म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या