Shivaji Patil on Satej Patil: हिंदू आणि मुस्लिमांचा इथं काय प्रश्न आहे? आरएसएसचा यात काय संबंध आणि त्यांच्याबद्दल का बोलताय? अशी विचारणा चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरात काल (9 जून) शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय अतिविराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून सतेज पाटील यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला.
आम्ही मोर्चा काढू शकतो
पाटील म्हणाले की,मुख्यमंत्र्यांच्या बाबत भान ठेवून विरोधकांनी बोललं पाहिजे. मुख्यमंत्री जेव्हा विरोधक होते तेव्हा अनेकांचे मंत्री पद त्यांनी घालवलं आहे. चंदगड आजरा मतदारसंघातील लोकांना घरदार सोडावे लागतात. काही आक्षेप असेल तर नक्कीच सांगा, मुख्यमंत्र्यांना भेटून आपण तो दूर करु. दोन खासदार, 3 मंत्री पद, महामंडळ आमच्याकडे आहेत. चंद्रकांत दादा, मुश्रीफ, अबिटकर पालकमंत्री आहेत. चंद्रकांत दादा, मुन्ना महाडिक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोर्चा काढू शकतो. मात्र, आम्हाला जनतेच्या भविष्यासाठी काम करायचे आहे आणि राजकारण करायचं नसल्याचे ते म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मी बोलणार
पाटील यांनी सांगितले की, शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघातील विकासासंदर्भात आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मी बोलणार आहे. लाॅजिस्टिक, रोजगार, शैक्षणिक हब, पायाभूत सुविधा अशा गोष्टी यामुळे निर्माण होणार आहेत. काही राजकीय नेत्यांनी आमच्या भागात ढुंकूनही बघितलं नाही. 33 हजार कोटी रुपयांच्या योजना मंजूर झाल्या आहेत. नदी रेषा, नदीची खोली करण्यात येणार आहे. भीती निर्माण करण्याच्या दृष्टीने कोणी विकासाच्या आड येऊ नये. 60 हजार कोटी रुपये भ्रष्टाचार होणार असं विरोधक बोलत आहेत, आमचं म्हणणं आहे कंत्राट त्यांनीच घ्यावे आणि काम करावे, असे शिवाजी पाटील म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग आम्ही मागून घेतला
आमदार शिवाजी पाटील म्हणाले की, राजू शेट्टींनी किती आंदोलनं केली आणि कितीमध्ये माघार घेतली हे कळेल तुम्हाला.लोकांची माथी भडकवण्याचे काम तुम्ही करत आहे हे चुकीचं होत आहे. किती शेतकरी सहभागी झाले होते त्यात? आमच्या कुटुंबात काय अवस्था आहे, अडचणींना सामोरे आम्ही जातोय. रोजगार नाही, शिक्षणासाठी पोरं बाहेर जातात. शक्तीपीठ महामार्ग आम्ही मागून घेतला आहे, यातून विकास होईल.
शिवाजी पाटील म्हणाले की, मी महापुरातूनच आमदार झालो आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी मदत केली. चंद्रकांतदादा सोडून किती लोकांनी आम्हाला मदत केली हे सांगावं. पुराचे थैमान घातले जाईल ही पण दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. शक्तिपीठचा रुट चेंज करायचा असेल तर त्यासंदर्भात चर्चा करु, माथी भडकवण्याचे काम करु नका. राजू शेट्टी यांना आमच्यासोबत या अशी विनंती असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
