Kolhapur ZP Election: कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने मरगळ झटकताना जोरदार मुसंडी मारली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या 68 पैकी 20 जागा जिंक मिनी मंत्रालयात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसकडून एकहाती सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा झुंज दिली असून त्यांना 15 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 13 जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. जनसुराज्य पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना 1 आणि शाहू आघाडी प्रणित राजेंद्र पाटील यड्रावकर गटाला चार जागा मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने आमदार विनय कोरे यांच्या बालेकिल्ल्यात यश खेचून आणलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.
कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
- भाजप - 13
- शिवसेना (शिंदे) - 9
- राष्ट्रवादी - 20
- काँग्रेस - 15
- शिवसेना (ठाकरे) - 1
- जनसुराज्य - 5
- स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
- शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4
कोल्हापूर जिल्हा परिषदेत तालुकानिहाय विजयी उमेदवारांची यादी
शाहुवाडी तालुका
१. शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील २. सरूड - अमर पाटील३. बांबवडे - राजकुंवर गायकवाड ४. आंबार्डे - स्नेहल वेल्हाळ
पन्हाळा तालुका
५. सातवे - डाॅ. जयंत पाटील ६. कोडोली - अमरसिंह पाटील ७. पोर्ले तर्फ ठाणे - भगवानराव पाटील ८. यवलूज - पूजा पाटील ९. कोतोली- वर्षाराणी अरुण पाटील १०. कळे -
हातकणंगले तालुका
११. घुणकी - शुभांगी महेश कुंभार१२. भादोले- सोनाली सावंत १३. कुंभोज - शीतल यादव १४. आळते - वर्षा सावर्डेकर १५. शिरोली पुलाची - सलीम महात १६. रूकडी- अतिष शिंगे१७. रूई -राहुल आवळे १८. कोरोची- सानिका आवाडे १९. कबनूर - कुमार कांबळे २०. पट्टणकोडोली - महेश पाटील २१. रेंदाळ - शिवाजी जाधव
शिरोळ तालुका
२२. दानोळी - नंदिनी संदीप कांबळे २३. उदगांव - अमोल चव्हाण २४. आलास - प्रशांत शहापुरे २५. नांदणी - प्रचिता कोळी २६. यड्राव - अर्चना चौगले २७. अब्दूललाट - श्रद्धा गायकवाड २८. दत्तवाड - बंडू चौगुले
कागल तालुका
२९. कसबा सांगाव - सुवर्णा कांबळे ३०. सिद्धनेर्ली - सुयशा घाटगे ३१. बोरवडे- शोभाताई फराकटे३२. म्हाकवे - काकासो सावडकर ३३. चिखली - शिवानी भोसले३४. सेनापती कापशी- शिल्पा खोत
करवीर तालुका
३५. शिये -हामू पाटील ३६. वडणगे - इंद्रजित पाटील ३७. उचगांव - नामदेव वाईंगडे३८. मुडशिंगी - तानाजी पाटील३९. गोकुळ शिरगांव- सूदर्शन खोत ४०. पाचगांव - संग्राम पाटील ४१. कळंबे तर्फ ठाणे- वनिता भोगम ४२. पाडळी खुर्द- राजेंद्र सूर्यवंशी ४३. शिंगणापूर - रसिका अमर पाटील ४४. सांगरूळ - रेखा मुगडे ४५. सडोली खालसा - एकनाथ पाटील ४६. निगवे खालसा - एकनाथ पाटील
गगनबावडा तालुका
४७. तिसंगी - सोनाली पाटील ४८. असळज - संभाजी पाटणकर
राधानगरी तालुका
४९. राशिवडे बुद्रुक - सागर धुंदरे ५०. कसबा तारळे - अरुण जाधव ५१. कसबा वाळवे - अमृता डोंगळे ५२. सरवडे - संयोगिता मोरे ५३. राधानगरी - अभिजित तायशेटे
भुदरगड तालुका
५४. गारगोटी - रेश्मा देसाई ५५. पिंपळगांव - रोहिणी आबिटकर ५६. आकुर्डे - अर्चना निकम ५७. कडगांव - सारिका नांदेकर
आजरा तालुका
५८. उत्तूर- शिरीष देसाई ५९. पेरणोली - सुधीर देसाई
गडहिंग्लज तालुका
६०. कसबा नूल - अनिरुद्ध रेडेकर ६१. हलकर्णी - शिवशंकर हत्तरकी ६२. भडगाव - अमरसिंह चव्हाण ६३. गिजवणे - शैलजा पाटील ६४. नेसरी - संग्राम कुपेकर
चंदगड तालुका
६५. आडकूर - राजश्री लक्ष्मण गावडे ६६. माणंगाव - मानसी कल्लाप्पा भोगण ६७. कुदनूर - विद्या विलास पाटील ६८. तुडये - रचना गावडे
इतर महत्वाच्या बातम्या
