Kolhapur Student Assault Video: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील (Talasande School Violence) एका शिक्षण संस्थेमध्ये लहानग्या विद्यार्थ्यांना त्याच संस्थेतील मोठ्या विद्यार्थ्यांकडून अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली. या प्रकरणाची कोल्हापूर पोलिसांसह प्रशासनाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली. मात्र, आता हा व्हिडिओ ताजा असतानाच आता पेठवडगाव परिसरातील (Peth Vadgaon School Viral Video) अन्य एका व्हिडिओ संस्थेचा व्हायरल झाल्याने खासगी वसतीगृहांमध्ये (Hostel Student Beating Case) सर्रास पद्धतीने रँकिंग सुरू आहे की विद्यार्थ्यांनी टोळ्या करून मिशा फुटण्यापूर्वीच मर्दुमकी गाजवण्यास सुरुवात केली आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पेठवडगाव परिसरातील विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Kolhapur Viral Video 2025)
तळसंदेनंतर आता पेठवडगाव परिसरातील शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Kolhapur Viral Video 2025) झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एकाच विद्यार्थ्याला बाथरूमपर्यंत नेऊन बेदमपणे मारहाण करत अनेकांचे हात अक्षरशः तुटून पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोणत्या कारणासाठी मारहाण होत आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याची माहिती आता शिक्षण संस्थेकडून घेण्यात येत आहे असल्याची माहिती आहे. मात्र, ज्या पद्धतीने शिक्षण खासगी संस्थांमध्ये बेदमपणे मारहाण केली जात आहे ते पाहता शिक्षण संस्थांमध्ये व्यवस्थापनाचा काही रोल आहे की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे.
होस्टेलमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का? (Hostel Safety Concerns Kolhapur)
आता होस्टेलमधील विद्यार्थी सुरक्षित आहेत का असा सुद्धा सवाल पालकांकडून केला जात आहे. काल (11 ऑक्टोबर) झालेल्या व्हायरल व्हिडिओनंतर त्या संबंधित शिक्षण संस्थेने संबंधितांवर कारवाई केली असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्या संस्थेमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांकडून सुद्धा बेदम मारहाण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच सहा महिन्यांपासून या संस्थेमधील अनेक व्हिडिओ चर्चेत आहेत. काही व्हिडिओ समोर आल्यानंतर संस्थेने समोर येत खुलासा केला असला तरी विद्यार्थ्यांनी चौकशी गेलेल्या शैक्षणिक अधिकाऱ्यांकडे खासगीमध्ये बोलताना झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला. त्यावरून तळसंदेतील संबंधित शिक्षण संस्थेत घडत असलेल्या घटनांचा अंदाज येण्यास पुरेसं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या