एक्स्प्लोर

Kolhapur Rain Update : मान्सूनपूर्व पावसानं कोल्हापुरातील रस्ते, गटारी तुंबल्या, पंचगंगा सुद्धा पुरती फेसाळली; शहराची बकाल अवस्था एक दिवसाच्या पावसानं उघडी पडली

Kolhapur Rain Update : कोल्हापुरात तब्बल 35 ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडली. जोरदार पावसाने कोल्हापुरातील परिख पूल सुद्धा तुंबला होता. 

Kolhapur Rain Update : कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याला गेल्या चार दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने (Kolhapur Rain Update) झोडपून काढलं आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पावसामुळे चांगलीच दैना झाली आहे. कोल्हापूर शहर परिसरामध्ये मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अक्षरशः शहराला झोडपून काढले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. सकल भागांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झालं होतं. महाद्वार रोडवर नवीन रस्त्यावर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झालं होतं. हाॅकी स्टेडियम ते  विश्वपंढरी रोड सुद्धा ड्रेनेज फुटल्याने अक्षरश: तुंबला होता. त्यामुळे वाहनधारकांची कसरत सुरु होती. कोल्हापुरात तब्बल 35 ठिकाणी झाडे कोसळून रस्त्यावर पडली. जोरदार पावसाने कोल्हापुरातील परिख पूल सुद्धा तुंबला होता. 

कसबा बावड्यात पंचगंगा नदी फेसाळली

जयंती नाला मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने ते पाणी जाऊन मिसळलं त्यामुळे पंचगंगा नदीत मिसळले. पंचगंगा नदी पूर्णपणे फेसाळली असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने कोल्हापूरची दैना इतक्या वाईट पद्धतीने होत असेल तर अजून पावसाळ्याचे दिवस बाकी असल्याने कोल्हापूरमधील नालेसफाईचा मुद्दा चिंतेचा विषय झाला आहे. कसबा बावडा परिसरातील राजाराम बंधारा इथल्या पंचगंगा नदी पात्रामध्ये प्रदूषणामुळे फेस तयार झाला आहे. नदीपात्रावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाल्याने नदीतील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे. नदीपात्रातील वाहत्या पाण्यामुळे प्रदूषणामुळे तयार झालेला हा फेस आता इचलकरंजीच्या दिशेने जात असल्याने त्या परिसरातील नागरिकांना देखील याचा त्रास होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अवघ्या कोल्हापूरचा परिसर जलमय 

कोल्हापूर शहरात मुसळधार पावसाने निम्म्या शहरात पाणी तुंबले. गटारी सुद्धा तुंबून वाहत असल्याने अनेक ठिकाणी तळी निर्माण झाली होती. कोल्हापूर शहरातील शाहूपुरी, राजारामपुरी, ताराराणी पुतळा, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी या परिसरात रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे नव्याने झालेल्या रस्त्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे सोयीपेक्षा गैरसोय झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
Samarjitsinh Ghatge Kolhapur news: देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
देवेंद्र फडणवीसांनी मुश्रीफ अन् माझ्यातील वैर संपवलंय, मी मूळ पक्षात परत येतोय: समरजीत घाटगे
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
कोल्हापूर : राधानगरी अभयारण्यात रायबा, सरदार आणि राणोजीला हवी वाघिणीची साथ; वाघीण स्थलांतरित करून आणल्यास पर्यटनाला चालना
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली
देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे; समरजीत घाटगेंची पुन्हा भाजपवापसी; मुंबईत पक्ष प्रवेशाची तारीख ठरली

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा पत्नीनंच काटा काढला, प्रियकराच्या मदतीने निर्घृणपणे संपवलं, मात्र सत्य समोर आलंच, घटनेनं कवठेमहांकाळ हादरलं!
Uttar Pradesh Accident: गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, महाराष्ट्रातील दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, गाजीपुरमध्ये यात्रेकरूंनी भरलेली बस डिव्हायडरला धडकून उलटली, दोन महिलांचा जागीच अंत, 35 यात्रेकरू जखमी
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Maharashtra Live blog updates: उन्हाळी सुट्टीत सर्वसामान्यांचा बस प्रवास महागला, 15 एप्रिल ते 15 जून दरम्यान 10% भाडेवाडीचा निर्णय
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Baramati byelection 2026: बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
बारामतीत काँग्रेसची माघार, पण 'हे' 22 जण मागे हटलेच नाहीत, सुनेत्रा पवारांविरोधात शड्डू ठोकणारे कोण?
Nashik Crime Ravindra Erande news: नाशिक पोलिसांनी नराधम रवींद्र एरंडेला चौदावं रत्न दाखवलं, लंगडत बाहेर पडला अन् म्हणाला....
नाशिक पोलिसांनी नराधम रवींद्र एरंडेला चौदावं रत्न दाखवलं, लंगडत बाहेर पडला अन् म्हणाला....
Embed widget