Kolhapur Rain Update: गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur News) दमदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 39.8 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद चंदगडमध्ये 87.5 मिलिमीटर इतकी झाली. दरम्यान आज सकाळी 11 वाजताच्या अहवालानुसार जिल्ह्यातील सर्व नद्यांची पातळी इशारा पातळीपेक्षा जास्त आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरु आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून बालिंगा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात एका राष्ट्रीय महामार्गासह 29 मार्ग बंद
भोगावती नदीवरील बालिंगा पूल जुना आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दुर्घटना टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने निर्णय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 24 राज्य मार्ग असून यामधील 9 मार्ग बंद पडले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 122 जिल्हा मार्ग आहेत. त्यामधील 20 मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे 29 मार्गांवरील वाहतूक पाणी आल्याने बंद पडली आहे. वैभववाडी-गगनबावडा-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचा समावेश आहे.
दरम्यान जिल्हा परिषदेकडेकडील एकूण 201 मार्गांपैकी 12 मार्ग बंद आहेत. ग्रामीणमधील 1997 मार्गांपैकी 18 मार्ग बंद आहेत. त्यामुळे 2198 मार्गांपैकी 30 मार्ग बंद आहेत. या सर्व मार्गांवर पर्यायी मार्गाने वाहतूक बंद आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 14 मार्गावरील एसटी सेवा बंद
- कोल्हापूर ते गगनबावडा
- रंकाळा ते पडसाळी
- रंकाळा ते आरळी
- रंकाळा ते चौकी
- रंकाळा ते गगनबावडा
- चंदगड ते गडहिंग्लज
- गडहिंग्लज ते हाजगोळी
- गडहिंग्लज ते नेसरी
- चंदगड ते बेळगाव
- चंदगड ते हेरा
- चंदगड ते कानूर
- चंदगड ते बुजवडे
- चंदगड ते कोल्हापूर
- कागल ते पणजी
कोणत्या नदीवरील कोणता बंधारा पाण्याखाली?
- पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ
- भोगावती नदी : हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे.
- कासारी नदी : यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे
- हिरण्यकेशी नदी : साळगाव, सुळेरान व चांदेवाडी, दांभीळ, ऐनापूर, निलजी
- घटप्रभा नदी : पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगाव, कानडे-सावर्डे व अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी
- वेदगंगा नदी : निळपण, वाघापूर, कुरणी, वस्तवडे, म्हसवे, गारगोटी, सुरुपली व चिखली, गारगोटी, म्हसवे, सुक्याचीवाडी, शेणगाव
- कुंभी नदी : कळे, शेणवडे, वेतवडे, मांडुकली, सांगशी, असळज
- वारणा नदी : चिंचोली, माणगाव, तांदुळवाडी, कोडोली, खोची
- कडवी नदी : भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव व सवते सावर्डे, सरुड पाटणे,
- धामणी नदी : सुळे, पनोरे, आंबडे
- तुळशी नदी : बीड
- ताम्रपर्णी नदी : कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाही, काकरे, न्हावेली, कोवाड
- दुधगंगा नदी : दत्तवाडी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी
इतर महत्वाच्या बातम्या