Sumangalam Lokotsav : कोल्हापुरातील सिद्घगिरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम लोकोत्सवात 10 ते 12 जनावरं अचानक दगावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धगिरी कणेरी मठावर सध्या पंचमहाभूतांवर आधारित सुमंगलम लोकोत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. लोकोत्सवात गायींचे महत्व समजून सांगितलं जात असतानाच गायी मृत्यूमुखी पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


दरम्यान, या घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. 10-12 जनावरं अचानक दगावल्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. मृत जनावारांच्या मृत्यूचा कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम काल (24 फेब्रुवारी) रात्रीपासून आजारी असलेल्या जनावरांवर उपचार करत आहेत. मृत जनावरांचे पोस्टमार्टम करून त्याचा तपास केला जाणार आहे. 


काय आहे महोत्सव?


या महोत्सवातून पर्यावरण जागृती, व्यापार उद्योगाची वृद्धी, सेंद्रिय शेतीचा प्रसार, यासह नव्या पिढीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोज दोन सत्रांत अनेक मान्यवरांचा मुक्त संवाद होत आहे. सेंद्रिय शेती कशी करावी, नवनवे स्टार्टअप कोणते आहेत, व्यवसाय सुरू करताना काय काळजी घ्यावी, यासह अनेक गोष्टींचे मार्गदर्शन होणार आहे. या लोकोत्सवात हजारावर साधूसंतांचा सहवास लाभणार आहे. यातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड कशी घातली जाईल, याची माहिती मिळेल. पाचशे कुलगुरू शिक्षण क्षेत्रातील नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील. दहा हजारांवर उद्योजक आपल्या यशस्वी वाटचालीचा लेखाजोखा मांडतील. चार हजारांवर वैदू औषधी वनस्पतींची माहिती देतील. जगभरातून येणारे परदेशी पाहुणेही प्रगतीचा मार्ग दाखविणार आहेत.


 


महत्वाच्या इतर बातम्या :