एक्स्प्लोर

Kolhapur News: 'द केरळ स्टोरी' सिनेमावरून सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट; संबंधित तरुणावर गुन्हा दाखल, मुस्लीम समाजाकडून आजरा बंदची हाक

Kolhapur News: 'द केरळ स्टोरी'चित्रपटाचा संदर्भ घेत एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मुस्लिम समाजाकडून निषेध म्हणून आजरा बंदची हाक देण्यात आली आहे.

Kolhapur News: 'द केरळ स्टोरी'चित्रपटाचा संदर्भ घेत एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्याने मुस्लिम समाजाकडून निषेध म्हणून आजरा बंदची हाक देण्यात आली आहे. काल (10 मे) सायंकाळच्या सुमारास एका हिंदू मुलाकडून मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावणारा संदेश सोशल मीडियामध्ये प्रसारित करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुस्लिम समाजातील काही लोकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. संबंधितांविरोधात गुन्हा नोंद करून तत्काळ अटक करावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या तरुणावर आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा निषेध म्हणून आज आजरा बंदची हाक देण्यात आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यामधील सध्या बाहेरगावी राहणाऱ्या एका तरुणाने 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचा संदर्भ घेत मुस्लिम बांधवांची भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर केली. यानंतर ही बातमी संध्याकाळी तालुक्यात पसरल्यानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने आजरा पोलिस स्टेशनच्या दारात एकत्र आले व संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्याची मागणी केली. 

यावेळी पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्यासह अन्य पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांना पाचारण केले. उपविभागीय अधिकारी राजीव नवले व स्थानिक सहा. पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी पोलीसांनी उपस्थित असणाऱ्या मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळीसोबत बैठकही घेतली. कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेऊन वातावरण बिघडतील अशी कृती करू नका असे आवाहनही त्यांनी केले. संबंधित तरुणास अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर मुस्लिम संघटनाकडून आजरा बंदची हाक देण्यात आली आहे, तर शहरामध्ये या घटनेच्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
25 लाखांच्या खंडणीसाठी भाजीपाला व्यापाऱ्याचं अपहरण केलं; नंतर बॅटरीने करंट देऊन संपवलं, थरारक घटनेनं कोल्हापूर हादरलं
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या... हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
Kolhapur jaggery: केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
केमिकल युक्त कोल्हापुरी गुळाच्या मुद्द्यावरून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्षाची चिन्हं; गुळ सौद्यांवर विपरीत परिणाम, उत्पादन थांबवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन

व्हिडीओ

Praful Hinge IPL : कोण आहे पहिलाच सामना गाजवणारा प्रफुल हिंगे? Special Report
Nagpur Shampoo Drugs : शाम्पूची बाटली, कोकेनचा फेस, तस्करीचा पर्दाफाश Special Report
Amravati Scandal : आरोपी अयान अहमदकडून किती जणींचं शोषण? भाजप आक्रमक Special Report
Ashok Kharat : भक्तांचे पॅनकार्ड, अफरातफरीचा रेकॉर्ड, प्रणिती शिंदेंचा काय म्हणाल्या? Special Report
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Politics: नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
नितीश पर्वाचा अस्त होताच बिहारमध्ये 'त्रिमूर्ती' उदयास; नितीश कुमारांनी लेकाला उपमुख्यमंत्री का केलं नाही? जेडीयूच्या भवितव्याचे काय?
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार? राजकीय चर्चेमागचं नेमकं कारण काय?
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
‘मी सावित्रीबाई..’मालिकेत मोठा ट्विस्ट! अमोल कोल्हे-मधुराणी गोखले यांची पुन्हा एंट्री; जातीभेदाविरोधात उभं राहणार फुले दांपत्य
Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
धक्कादायक! मुंबई महापालिकेत नगरसेविकेच्या पर्समधून 20 हजार चोरीला; स्थायी समितीत खळबळ
KKR : आयपीएलमध्ये शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, कोलकाता नाईट रायडर्सचं नेमकं काय चुकलं? मोहम्मद कैफ यांनं नेमकं कारण सांगितलं
शाहरुख खानच्या संघाची विजयाची पाटी कोरी, अजिंक्य रहाणेच्या केकेआरचं काय चुकलं, मोहम्मद कैफ म्हणाला...
Radhakrishna Vikhe Patil on Ashok Kharat: 'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
'एकनाथ शिंदे शिर्डीत आले अन् मला म्हणाले, एके ठिकाणी जायचंय...'; राधाकृष्ण विखे-पाटलांनी सांगितली अशोक खरातच्या भेटीमागची कहाणी
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
संतापजनक... पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक
Embed widget