कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणावरून गेल्या काही दिवसांमध्ये शिवभक्तांमध्ये कमालीचे संतप्त वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत विशाळगडावरील अतिक्रमण काढून टाकण्यात यावे, यासाठी सातत्याने मागणीसह आंदोलने सुद्धा केली जात आहेत. विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात तातडीने कारवाई होण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली आहे.
या संदर्भातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी संभाजीराजे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील दुर्गप्रेमी संस्था आणि शिवभक्त उपस्थित राहणार आहेत. रविवारी 7 जुलै रोजी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
विशाळगडाचा करेक्ट कार्यक्रम करु
दरम्यान, दुर्गे दुर्गेश्वर रायगडावर 351 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विशाळगडाच्या मुद्याला हता घातला होता. विशाळगड प्रकरण न्यायप्रविष्ठ आह, पण करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. शिवभक्तांच्या भावनांची दखल घेतली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर केलेल्या भाषणात दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदय सामंत देखील हजर होते.
रायगडावर विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा शिवभक्तांनी उचलून धरला. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणावेळी उत्तर दिले. तसेच रायगडच्या विकासासाठी आणि शिवसृष्टी उभारण्यासाठी सरकार देत असलेला निधी याचा उल्लेख देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे ही घोषणा संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिली जात होती. तसेच रायगडमधील महाड येथील गोहत्या वरील फलक देखील झळकवले जात होते. विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा नेत्यांच्या भाषणावेळी देखील घोषणा देऊन उपस्थित केला गेला.
इतर महत्वाच्या बातम्या