कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष आणि चिन्हांवरून गेल्या दीड वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन लढा सुरु असतानाच आता चक्क एका गणपती मंडळापर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे. कोल्हापूर शहरामध्ये शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्येही पक्षातील वादामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत ज्यांनी मंडळ स्थापन केलं आहे त्यांनी मुर्तीची प्रतिष्ठापना करावी, आणि राजकीय गटांनी दूर राहावे, असा तोडगा काढण्यात आला होता. मात्र, रात्रीत त्याठिकाणी शिंदे गटाकडून 21 फुटी मूर्ती बसवण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला. 


शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वाद 


दोन्ही गट आमनेसामने आल्याने याठिकाणी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. शिंदे गटाने बैठकीनंतरही 21 फुट मुर्ती बसवल्याने वादाला तोंड फुटले. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटाकडूनही क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्याच मंडपात 21 फुटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला.  त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 


शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट


छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळामध्ये शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळात ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मंडळाची मूर्तीची प्रतिष्ठापना कोण करणार? यावरुन वाद निर्माण झाला होता. म्हणूनच या ठिकाणी स्थापन केलेल्यांनी गणेशोत्सव साजरा करावा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये असे पोलिस प्रशासन व झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वादाची ठिणगी पडली. हा सर्व प्रकार सुरू असताना त्याठिकाणी शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर पोहोचले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या