कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी (Kolhapur Municipal Corporation elections 2022) प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, जमाती, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रभागातील महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. आरक्षण निश्चित झाल्याने इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. मनपाची प्रभाग रचना त्रिसदस्यीय असून 92 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येचा विचार करण्यात आला आहे. दरम्यान, निश्चित करण्यात आलेल्या सर्व 31 प्रभागामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील 1 महिला आरक्षण ठेवण्यात आले आहे. त्यानुसार 46 जागा महिलांसाठी राखीव असतील.
असे आहे आरक्षित प्रभाग
अनुसूचित जाती (महिला)
- प्रभाग क्रमांक - 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ, 30 अ,
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक - 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ, 18 अ
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक - 1 ब, 2 ब, 3 अ, 4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब, 8 अ, 8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ
अनुसूचित जमाती
प्रभाग क्रमांक - 2 अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक - 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब
कोल्हापूर मनपासाठी अशी आहे प्रभाग रचना
- एकूण प्रभाग 31
- नगरसेवक संख्या 92
- त्रिसदस्य प्रभाग 30
- द्विसदस्य प्रभाग 01
- अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग 06
- अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग 06
- अनुसूचित जमाती प्रभाग संख्या 01
- सर्वसाधारण महिला प्रभाग 40
- खुला प्रभाग 39 /40
हे ही वाचलं का ?