Kolhapur fire station slab collapse : कोल्हापूर महापालिकेच्या फायर स्टेशन क्रमांक पाचच्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकतानाच कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा जागीच (Kolhapur slab collapse death) मृत्यू झाला होता. काल (30 सप्टेंबर) संध्याकाळी साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. कामाचा ठेकेदार शशिकांत पवारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये (Kolhapur police case against contractor) दाखल करण्यात आला आहे. मनपाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
स्लॅब नेमका कसा कोसळला? (How Kolhapur fire station slab collapse)
काल रात्री साडेनऊच्या सुमारास फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीचा स्लॅब टाकण्यात येत होता. मात्र, अवघ्या एका पोत्याचा स्लॅब शिल्लक राहिला असताना खाली लिफ्टच्या धक्क्याने खाली कोसळला. या घटनेत नवनाथ अण्णाप्पा कागलकर (वय 35 रा. नवश्या मारुतीजवळ, राजारामपूरी, कोल्हापूर) हे जाग्यावर मृत झाले. अक्षय पिराजी लाड, दत्तात्रय सुभाष शेंबाडे, वैभव राजू चौगुले हे गंभीर जखमी झाले, तर जया शेंबडे व सूमन वाघमारे या किरकोळ जखमी झाल्या. यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. फुलेवाडीमध्ये फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅप टाकण्यात येत होता. या कामाला सोमवारी सुरुवात झाली होती. मंगळवारी प्रत्यक्ष स्लॅब टाकण्यास सुरुवात करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारातील शेवटच्या पोत्याचा स्लॅब टाकला जात असताना लिफ्टचा धक्का लागल्याने अवघा टाकलेला स्लॅब खाली कोसळला. यावेळी स्लॅबवर चारजण काम करत होते, तर स्लॅबखाली दोन कामगार होते. स्लॅब कोसळताच चौघेजण दबले गेले. नवनाथ कागलकर यांचा जागेवर मृत्यू झाला.
'या कामामध्येही टक्केवारी होती का बघा' (Kolhapur Municipal Corporation negligence)
टाकतानाच स्लॅब कोसळल्याने महापालिकेच्या (Kolhapur civic body corruption allegations) कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. या दोन मजली इमारतीचं काम कोल्हापुरातील रेणुका कंस्ट्रक्शन कंपनीकडे देण्यात आलं होतं. 2024 मध्ये या कामाला सुरुवात करण्याचा आदेश देण्यात आला. तीन महिन्यापूर्वी हे काम ठेकेदार शशिकांत पवारकडे आले. त्यामुळे सोमवारपासून स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्याता आली होती. मात्र, हा स्लॅब टाकतानाच कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहेत. स्लॅब कोसळताच झालेल्या गर्दीमध्येही महापालिकेविरोधात (Kolhapur civic body corruption allegations) संताप व्यक्त करण्यात येत होता. या कामामध्ये टक्केवारी होती का बघा एकदा, अशी प्रतिक्रिया सुद्धा आली.
इतर महत्वाच्या बातम्या