Kolhapur Municipal Corporation: ठाकरेसेनेच्या सुनील मोदींना काँग्रेसनं स्वीकृत नगरसेवकपदी संधी देताच शिंदे सेनेच्या नेत्याकडून ऑडिओ क्लिप व्हायरल; न्यायालयात जाण्याचा इशारा, पण सभागृहात विरोध नाही!
Kolhapur Municipal Corporation: शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख असलेल्या सुनील मोदी यांनी काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली आहे.

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच दोन्ही शिवसेनेकडून पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुनील मोदी यांची ऑडिओ क्लिप शिंदे सेनेचे नेते सुनील कदम सार्वजनिक केली. सुनील मोदी स्थायी समिती सभापती असताना त्यांनी एका खासगी कंपनीला टेंडर दिलं होतं. त्या बदल्यात आपल्या हस्तकाच्या खात्यावर त्यांनी पैसे घेतल्याचा आरोप असून ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक देवाणघेवाण संबंधी माहिती आहे. दुसरीकडे, स्वीकृतसाठी आज (20 फेब्रुवारी) सभा झाली. मात्र, सुनील मोदी यांना सभेत विरोध झाला नाही. शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख असलेल्या सुनील मोदी यांनी काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्यात आली आहे.
भ्रष्टाचारी माणसाला काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक केलं
सुनील मोदी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल करणारे सुनील कदम म्हणाले की, सुनील मोदी यांनी एचसीएल कंपनी संदर्भात केलेल्या भ्रष्टाचाराची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. या भ्रष्टाचारी माणसाला काँग्रेसने स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. हा कोल्हापूर महानगरपालिका इतिहासातील काळा दिवस आहे. माझा सुनील मोदी यांच्या स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडीला विरोध आहे म्हणूनच मी आज काळा ड्रेस घालून आलो आहे. या भ्रष्टाचारी माणसांना तुम्ही स्वीकृत सदस्य करून घेऊ नका, असे ते म्हणाले. महापौरांनी भ्रष्टाचारी सुनील मोदी यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून घेतलं तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचे म्हणाले. एचसीएल कंपनीमार्फत महानगरपालिका हद्दीतील जन्माच्या नोंदी आणि दाखले दिले जात आहेत. त्यामुळे हा भ्रष्टाचार फक्त पैसे मिळवण्यापुरता नाही तर जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी मध्ये फेरफार देखील केल्या आहेत. त्यामुळे याची गंभीर दखल घ्या अन्यथा उद्यापासून मी या प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याचे सुनील कदम यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























