Kolhapur Gokul Milk Union News : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर (Kolhapur Gokul Milk Union ) अखेर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. साताऱ्याचे जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक यांची गोकुळ प्रशासक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची आज मुदत संपत आहे. मुदत संपताच प्रशासनाकडून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण वातावरण तापलं
गोकुळ प्रशासक नियुक्ती वरुन गेल्या 15 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण वातावरण चांगलच तापलं आहे. गोकुळवर प्रशासक नियुक्त होऊ नये यासाठी मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील होते. मात्र, अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
गोकुळवर प्रथमच प्रशासकाची नियुक्ती
दरम्यान, दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी 16 मार्च 1963 ला गोकुळ दूध संघाची स्थापना झाली. गेल्या 63 वर्षात संघ जिल्ह्याच्या अर्थकारणाचे केंद्रबिंदू बनला. जिल्ह्याची शिखर संस्था केडीसीसी बँकेवर आतापर्यंत दोन वेळा प्रशासक आले, पण गोकुळवर प्रथमच प्रशासक येत असल्याने संघाशी जोडलेल्या सर्वच घटकांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. यापूर्वी 'केडीसीसी बैंक, 'बिद्री' व "भोगावती' कारखान्यांवर प्रशासकीय मंडळ आले होते. बँक असो वा साखर कारखाना त्यांचे कामकाज व दूध संघ यांच्यात फरक आहे. गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याआधीच ज्या पद्धतीने आरोप, प्रत्यारोप सुरू आहेत ते पाहता प्रशासकांनीही कामकाज करताना काही प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. आव्हान देऊन प्रशासक आणला जात असल्याने साहजिकच 'गोकुळ'च्या राजकीय विश्वात अस्वस्थता अधिक आहे.
'गोकुळ'चे आतापर्यंत झालेले अध्यक्ष
एन. टी. सरनाईक- 16 मार्च 1963 ते 28 मे 1971 आनंदराव पाटील-चुयेकर- 29 मे 1971 ते 3 डिसेंबर 1990अरुण नरके - 3 डिसेंबर 1990 ते 13 डिसेंबर 2000 आनंदराव पाटील-चुयेकर- 23 डिसेंबर 2000 ते 21 नोव्हेंबर 2001रणजितसिंह पाटील - 21 नोव्हेंबर 2001 ते 6 डिसेंबर 2004 विश्वास पाटील - 6 डिसेंबर 2004 ते 2 डिसेंबर 2006 राजकुमार हत्तरकी- २ डिसेंबर २००६ ते २८ नोव्हेंबर २००८ रवींद्र आपटे - 28 नोव्हेंबर 2008 ते 30 नोव्हेंबर 2010 अरुण डोंगळे - 30 नोव्हेंबर 2010 ते 17 ऑक्टोबर 2013 दिलीप पाटील- 17 ऑक्टोबर 2013 ते 7 मे 2015 विश्वास पाटील - 7 मे 2015 ते 14 जानेवारी 2019रवींद्र आपटे - 14 जानेवारी 2019 ते 13 मे 2021 विश्वास पाटील - 14 मे 2021 ते 13 मे 2023 अरुण डोंगळे 13 मे 2023 ते 14 मे 2025 नवीद मुश्रीफ 14 मे 2025 ते आतापर्यंत