Kolhapur Crime News : ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडेच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकले; मारेकरी इतके क्रूर का झाले? नेमकं काय घडलं होतं?
Kolhapur Crime News : लखन बेनाडेचे हात, पाय आणि शीर देखील धडा वेगळं केलं होतं, त्याच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून ते हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूरातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचा ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे नावाचा व्यक्ती गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता (Kolhapur Crime News), त्याच्या बहिणीने पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती. यानंतर आठ दिवसांनी या प्रकरणाचा तपास लागला असून त्या ग्रामपंचायत सदस्याच्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. खून प्रकरणी चार संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी खुनाची कबूली दिली (Kolhapur Crime News. लखन बेनाडेचे हात, पाय आणि शीर देखील धडा वेगळं केलं होतं, त्याच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरून ते हिरण्यकेशी नदीत फेकल्याची कबुली संशयितांनी दिली आहे, या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.(Kolhapur Crime News)
महिलेशी संबंध, पोलिस ठाण्यात तक्रार अन् पैशांचं कनेक्शन
या प्रकरणातील मृत लखन बेनाडे हा एका महिलेच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करीत असल्याचा राग मनात धरून त्याचा खून केल्याचे शुक्रवारी उघड झाले. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. विशाल बाबूराव घस्ते, आकाश ऊर्फ माया दीपक घस्ते (रा. तामगाव, ता. करवीर), संस्कार महादेव सावर्डे (रा. देवाळे, ता. करवीर), अजित उदय चुडेकर (रा. राजकपूर पुतळा, जुना वाशी नाका, कोल्हापूर), लक्ष्मी विशाल घस्ते (रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी महिला लक्ष्मी हिच्याविरोधात बेनाडे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वारंवार तक्रारी करतो म्हणून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात पुढं आलं आहे.
वाद, राग अन् संतापानं गाठली कौर्याची परिसीमा
पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, बेनाडे यांचा आरोपी महिला लक्ष्मी घस्ते हिच्यासोबत वाद होता. यातून बेनाडे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तक्रार करीत होता. त्याचा राग मनात धरून सायबर चौकात बेनाडेचा 10 जुलैला पाठलाग करून संशयित पाचही आरोपींनी त्यांना तवेरा गाडीत जबरदस्तीनं घातलं. त्याला संकेश्वर येथं नेलं. तिथं गेल्यावर तलवार, एडका, चॉपर या धारदार हत्याराने बेनाडेचं डोके, दोन्ही हातपाय धडापासून वेगळे करून अतिशय क्रूरपणे खून केला पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह हिरण्यकेशी नदीत फेकून दिला होता.
लखनची पार्श्वभूमी गुन्हेगारी
लोकमत वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, रांगोळी गावातील ग्रामपंचायत सदस्य असलेल्या लखन बेनाडेची देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी होती, एका राजकीय पक्षाचा तो असल्याने तो दादागिरी करायचा. पक्षाचा आधार घेऊन महिलांना भुलवून त्यांचा गैरफायदा घेत होता. तो ज्या मार्गानं चालला होता, त्याच मार्गाने त्याचा अंत झाला आहे. तो एका पक्षाचा कार्यकर्ता होता. 2022 ला त्यानं अपक्ष म्हणून ग्रामपंचायत निवडणूक देखील लढवलेली आणि तो ग्रामपंचायतीवर सदस्य झाला होता. तो त्रास देत असलेल्या महिलांनी याबाबत रिल्स करुन सोशल मीडियावर त्याच्या वागणुकीचे पाढे वाचायला सुरूवात केली होती. त्याच्यावरती आरोग्य महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार प्रकरणाचा गुन्हा देखील पोलिस ठाण्यात दाखल आहे. विनयभंग, मारामारी, बलात्कार यासारखे गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावरती आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित महिलेशी शरीर संबंध ठेवले, त्याचे व्हिडीओ काढले ते व्हायरल करण्याची धमकी देऊन मानसिक, शारीरिक त्रास दिला, पोलिस ठाण्यात वारंवार तक्रार देणं सुरू होतं, या रागातूनच बेनाडे याचा विशाल घस्ते व साथीदारांनी अपहरण केलं आणि हत्या केली. विशाल घस्ते याला पोलिसांनी उचललं आणि चौकशी केली तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा पोलिसांनी त्याची व्यवस्थित चौकशी केली असता त्यानं सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यामध्ये अटक झाल्यामुळं विशाल घस्ते कारागृहात गेला असं त्याने पोलिसांना सांगितले. घस्ते कारागृहात गेल्यानंतर संबंधित महिला बेनाडे याच्याकडे बचत गटाच्या कर्ज मागणीसाठी गेली होती. बेनाडे याने तिचा गैरफायदा घेऊन तिच्याशी शरीर संबंध ठेवले. तिला घरीच ठेवून घेतले. त्याचे व्हिडीओ करून व्हायरल करण्याची धमकी दिली. वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिला.
दरम्यान, विशाल घस्ते कारागृहातून सुटला. त्यावेळी बेनाडे यांच्या घरातून ती महिला कोल्हापुरात आली. बेनाडे याने विशाल घस्ते आणि त्या महिलेविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दिल्या. बेनाडे 10 जुलैला शाहूपुरी येथे आला होता. त्याने महिलेस मी तुमच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारी मागे घेतो, तू माझ्या बरोबर चल, असं सांगून बोलावून घेतलं. त्या महिलेने विशाल घस्ते यालाही बोलावून घेतले. त्यावेळी लखन बेनाडे हा सायबर चौकात होता. घस्ते याने साथीदार आकाश ऊर्फ माया दीपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर यांना बोलावून घेतले व बेनाडे याचा सायबर चौकातून कारमधून पाठलाग सुरू केला. त्यास शाहू टोल नाक्याजवळून जबरदस्तीने कारमध्ये घालून संकेश्वरला नेले. तेथे खून करून त्याचे तुकडे करुन पोत्यात भरले व नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावली.


















