Kolhapur bull News : कोल्हापूर जिल्ह्यातील निगवे खालसा (ता. करवीर) (Kolhapur bull News) येथील बेंदराच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमात सजवलेल्या बैलाची दोरी सुटली आणि बैल उधळलेले पाहायला मिळाले. (Kolhapur bull News) त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. (Kolhapur bull News) दरम्यान,  बैल उधळल्याने उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही.

बैलांची दोरी सुटल्याने उपस्थितांची पळता भुई थोडी 

दरवर्षीप्रमाणे यंदाही निगवे खालसा येथे बेंदराचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत होता. यासाठी गावात पारंपरिक वाद्ये, बैलजोडींचा मिरवणूक सोहळा आणि पूजन याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान, बैलांची दौरी सुटली. त्यानंतर दोन्ही बैल उधळलेले पाहायला मिळाले. बैल उधळल्यानंतर उपस्थित सर्व तरुणांनी धावण्यास सुरुवात केली. यावेळी काही तरुण खाली पडलेले देखील पाहायला मिळाले. 

इचलकरंजीतील मिरवणुकीत तरुणीला नाचवले

कोल्हापूर जिल्ह्यात बेंदूर सण दरवर्षी मोठ्या थाटात साजरा केला जातो. यंदाही गुरुवारी (दि. 12) मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक उत्साहात बेंदूर साजरा करण्यात आला. इचलकरंजी तालुक्यातील एका गावात झालेल्या मिरवणुकीत मोठा वाद झालेला पाहायला मिळाला.  या मिरवणुकीत एका तरुणीला नाचवण्यात आले. तरुणीचा डान्स पाहाण्यासा  तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. डान्स आणि डीजेच्या गोंगाटामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी स्वतः हस्तक्षेप करत डॉल्बी थांबवला. या वेळी पोलिस आणि मिरवणूक आयोजकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी कार्यक्रम शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत योग्य कारवाई केली. डीजेचा आवाजाने येथील परिसर दणाणून सोडला होता. मात्र, पोलिसांनी हा डीजे वेळेत बंद केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

कोल्हापुरात बेंदूर सणाच्या मिरवणुकीत तरुणीला नाचवले, गौतमीला टक्कर देणारा डान्स, मग DYSP ची एन्ट्री VIDEO

लॉजवर गेले अन् वादाला सुरुवात, कोल्हापुरात प्रियकराने प्रेयसीला जागेवर संपवलं; बायकोचाही काढला होता काटा