Kolhapur BJP leader Shoumika Mahadik Video : कोल्हापुरातील दोन्ही जागांसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदारपणे प्रचार करत मतदारसंघ पिंजून काढले जात आहेत. कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या कागलमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये बोलताना भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी देश कोणाच्या हातात देणार? अशी विचारणा केली. यानंतर व्यासपीठाशेजारी असलेल्या तरुणाकडून राहुल गांधी असे उत्तर आल्याने संपूर्ण सभेचा माहोल बदलून गेला. बघता बघता बोलणाऱ्या शौमिका महाडिकांसह पालकमंत्री हसन मुश्रीफ सुद्धा हास्यकल्लोळात बुडाले.






अवघ्या काही सेकंदामध्ये घडलेल्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियातही जोरदार व्हायरल झाला असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.


नेमकं घडलं तरी काय? 


भाजपच्या आक्रमक नेत्या आणि सतेज पाटील यांना भिडणाऱ्या अशीच ओळख शौमिका महाडिक यांची असल्याने कागलच्या सभेत त्या काय बोलणार? याकडे लक्ष होते. शौमिका महाडिक इतर मुद्यांना स्पर्श केल्यानंतर विषय देशाच्या पंतप्रधानाचा निघाला आणि देशाचे नेतृत्व कोण करणार याबाबत बोलण्यास सुरुवात केली. 


 शौमिका महाडिक म्हणाल्या की, देशाचा पंतप्रधान कसा असायला हवा याचा विचार आपण केला पाहिजे. भाजपकडे पंतप्रधान मोदी यांचं नाव समोर आहे. दुसरीकडे काँग्रेस आघाडीकडे तोडीचा एकही नेत नाही. फार तर राहुल गांधींचे नाव पंतप्रधानपदासाठी असू शकेल, पण मला सांगा, पंतप्रधान म्हणून देश तुम्ही राहुल गांधी यांच्या हातात देणार की नरेंद मोदींच्या हातात देणार? यानंतर काही क्षणात व्यासपीठाजवळ असलेल्या एकाने राहुल गांधी असे उत्तर दिले.


धीरगंभीर वातावरणात एकदम राहुल गांधी असे उत्तर अवघी सभा हास्यकल्लोळात बुडाली. शौमिका महाडिक यांचाही भाषण करतानाच मुड बदलून गेला. मागे बसलेल्या हसन मुश्रीफ यांनाही हसू अनावर झाले आणि ते पोट धरून हसले. या घडलेल्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून प्रतिक्रिया सुद्धा उमटत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या