एक्स्प्लोर

RTI : 15 लाखांची लाच घेणाराच RTI महासंघाचा उपाध्यक्ष, अधिकाऱ्यांना पैशासाठी ब्लॅकमेलिंग करण्याचे आरोप

Jayaraj Koli : कोल्हापुरातील स्वयंघोषित माहिती अधिकारी कार्यकर्ता जयराज कोळी याची पश्चिम महाराष्ट्र महासंघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने उलट सुटल चर्चा सुरू आहे.

कोल्हापूर : लाचखोर जयराज कोळीची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच 15 लाखाची लाच घेताना साथीधारासह जयराज कोळीला कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्याच्या नियुक्तीनंतर आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

जयराज कोळी हा सरकारी अधिकारी आणि कंत्राटदारांना माहिती अधिकाराचा अर्ज टाकण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग करायचा. लाच घेताता तो रंगेहातही सापडला आहे. असं असतानाही लाचखोर जयराज कोळीला माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने पद दिल्याने कोल्हापुरात उलट सुलट चर्चा सुरू आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेमधून जयराज कोळी याची याआधीच हकालपट्टी करण्यात आली आहे.

जयराज कोळी या स्वयंघोषित माहिती अधिकारी कार्यकर्त्याविरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. खंडणी, धमकी आणि खोट्या चौकशांची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार त्याने वेळोवेळी केला आहे.

15 लाखांची लाच घेताना अटक

स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता जयराज कोळी याला जून महिन्यात 15 लाखाची खंडणी घेताना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. जयराज कोळी बरोबरच त्याचा साथीदार युवराज खराडेला देखील पोलिसांनी अटक केली.

औषधी उपकरणे पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला जयराज कोळी चौकशीचे खोटे अर्ज दाखल करून वारंवार त्रास देत होता. सगळे अर्ज मागे घेतो मात्र 20 लाख रुपये दे अशी मागणी जयराज कोळी यांने केली. शेवटी 15 लाखावर तडजोड झाली आणि कागलच्या लक्ष्मी टेकडीच्या जवळ हे पैसे देण्याचे ठरले.

फिर्यादीने आधीच या संदर्भातली माहिती पोलिसांना दिली होती. त्यामुळे सापळा रचून पोलिसांनी जयराज कोळी आणि युवराज खराडेला पकडले. या दोघांवर देखील कागल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामाजिक कामाच्या नावाखाली ब्लॅकमेलिंगचा धंदा

सामाजिक कार्याच्या नावाखाली जयराज कोळी याने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू केला होता. सीपीआर मध्ये माहिती अधिकाराचे अर्ज टाकून संबंधित व्यक्तींना त्रास देत पैशाची मागणी केली जात असे. मात्र या प्रकरणात जयराज कोळी याचे कारनामे समोर आले. जयराज कोळी हा पूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचा पदाधिकारी होता.मात्र त्याचे हे कारनामे बघून प्रहार संघटनेमधून त्याचे हकलपट्टी करण्यात आली.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
'ज्या अदृश्य शक्तीने गेल्या तीन महिन्यांपासून त्रास दिला, त्यांना जागा दाखवणार, अन्यायाची परतफेड करणार..' गोकुळ निवडणुकीसाठी पात्र 1400 दूध संस्थांचा अदृश्य शक्तीविरोधात एल्गार
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
माधुरी हत्तीणीला वनतारामध्येच ठेवा; 'पेटा'कडून नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचाली सुरू होताच राज्य सरकारला पत्र
Gokul Election 2026 : कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
कोल्हापूरच्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर! 18 ऑक्टोबरला मतदान तर 19 ला निकाल; सतेज पाटील विरुद्ध महायुती असा सामना
Sambhaji Bhide: दहीहंडीत गौतमी पाटील, राधा पाटील यांना नाचवले; संभाजी भिडे संतापले; म्हणाले, देशद्रोहींनो...
दहीहंडीत गौतमी पाटील, राधा पाटील यांना नाचवले; संभाजी भिडे संतापले; म्हणाले, देशद्रोहींनो...

व्हिडीओ

Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
आज जे सुरुय त्याला लोकशाही म्हणायला फार मोठं धाडस लागेल, कोणत्याच राजकीय पक्षात अंतर्गत लोकशाही राहिली नाही हे खूप धाडसाने मी बोलतोय; पृथ्वीराज चव्हाणांचं थेट वक्तव्य
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
मस्कवर डॉक्यूमेंट्री, पहिल्या बायकोसह अत्यंत निकवर्तींयाचे अत्यंत गंभीर आरोप; सत्तेसाठी कोणत्याही थराला अन् बाई म्हणजे त्याच्यासाठी मुलं जन्माला घालणारी मशीन अन् बरंच काही!
Uday Samant: रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
रोहित पवार जमलेल्या गर्दीसोबत उभं राहून नेतृत्व करतात; उदय सामंतांची टीका, आदित्य ठाकरेंनाही सल्ला
Zahir Khan: झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
झहीर खान सुद्धा झाला क्रिकेट टीमचा मालक! सिक्सर किंग युवराजनं सुद्धा केलं ग्रँड वेलकम
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
iPhone Duo बजेटमध्ये भारतात नव्या चकचकीत कार खरेदी करता येतील! किंमत पाहून विश्वास बसणार नाही
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
साताऱ्यातील चिमुकल्याची मृत्युशी झुंज; दुर्मिळ आजारावरील उपचारासाठी सव्वा कोटींची गरज; आईची लेकासाठी आर्त हाक
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला होणाऱ्या विलंबाबद्दल मला लाज वाटते, उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार नाही : नितीन गडकरी
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
माझ्या पुतण्याला बुलेटच्या रॉडने, हातातील कड्याने जबर मारहाण, पैसेही काढून घेतले; मंत्री अतुल सावेंनी दिली माहिती
Embed widget