शरीरसंबंध ठेवत बायकोविरुद्ध वारंवार तक्रारी दिल्याचा राग, कोल्हापुरात ग्रामपंचायत सदस्याला तवेरात कोंबून हात, पाय आणि शीर सुद्धा धडावेगळं केलं अन् तुकडे हिरण्यकेशी नदीत फेकले
Kolhapur Crim: लखन बेनाडेची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक महिलांना त्याने छळून त्यांचा गैरफायदा घेतला होता. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याचा शेवटही त्याच्या वर्तनाप्रमाणे झाला आहे.

Kolhapur Crime: नवरा एका गुन्ह्यात जेलमध्ये गेल्यानंतर बायकोनं बचत गटात कर्ज मागण्यासाठी गेल्यानंतर तिचा गैरफायदा घेत शारिरीक संबध ठेवून तेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याने तसेच विविध पोलिस ठाण्यात केसेस करून त्रास देत असल्याने सराईत टोळीने बेपत्ता ग्रामपंचायत सदस्याचा हात पाय तोडून आणि शीर सुद्धा धडावेगळ करून हिरण्यकेश नदीत फेकून दिल्याची घटना कोल्हापुरात घडली. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून तो हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचा ग्रामपंचायत सदस्य होता. तो गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याने बहिणीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर आठ दिवसांनी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. खून प्रकरणी चार संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्यानंतर त्यांनी खुनाची कबूली दिली. लखन बेनाडेची सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी असून अनेक महिलांना त्याने छळून त्यांचा गैरफायदा घेतला होता. त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याचा शेवटही त्याच्या वर्तनाप्रमाणे झाला आहे. महिलांनी रील करून त्याच्या अत्याचाराचा पाढा वाचला होता.
पोलिसांनी लक्ष्मी विशाल घस्ते (वय 36, रा. राजेंद्रनगर) आकाश उर्फ माया दिपक घस्ते (वय 21 रा. तामगाव ता करवीर कोल्हापूर) संस्कार महादेव सावर्डे (वय 20 रा. देवाळे ता. करवीर कोल्हापूर) अजित उदय चुडेकर ( वय 29 रा. राजकपुर पुतळा, जुना वाशी नाका कोल्हापूर) यांना अटक केली असून गुन्ह्याची कबूली दिली आहे.
असा झाला खुनाचा उलघडा
बेपत्ता लखनचा शोध घेताना विशाल गस्ते हा उजळाईवाडी येथील अर्जेंट कार वॉश सेंटरमध्ये मिळाला. त्याच्याकडे लखनची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच विशालने दोन वर्षांपूर्वी राजारामपुरी पोलीस ठाणेच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेल्याची माहिती दिली. त्यावेळी पत्नी लक्ष्मी लखन बेनाडेकडे बचत गटातून कर्ज मागणीसाठी गेली होती. लखनने तिचा गैरफायदा घेत शरीर संबंध ठेवले व व्हिडीओ करुन व्हायरल करण्याची धमकी देत होता. लखनने अनेक ठिकाणी तक्रार केल्या होत्या.
लखन म्हणाला तक्रार मागे घेतो, पण...
10 जुलै रोजी लखन कोल्हापुरात शाहुपुरीत आल्यानंतर लक्ष्मीला फोन करून दिलेल्या तक्रारी मागे घेतो तू बरोबर चल असे म्हणून बोलावलं होतं. त्यावेळी विशालला सुद्धा लक्ष्मीने फोन करून बोलावलं. यावेळी विशाल येताच लखनने लक्ष्मीला मारहाण केली व निघून गेला. त्यानंतर विशाल घस्ते व त्याची पत्नी लक्ष्मी राजेंद्रनगर जाताना लक्ष्मीने ठार मारण्यास विशालला सांगितले. यावेळी लखन सायबर चौकात होता. विशालने साथीदारांना बोलवून लखनचा काटा काढायचा असे ठरवले. आरोपींनी लखन बेनाडेचा सायबर चौकमधून तवेरा कारमधून पाठलाग सुरु केला. पाठलाग करुन त्याला शाहु टोल नाका जवळून जबरदस्तीने तवेरात कोंबून हायवेनं संकेश्वरच्या हद्दीत नेत त्याचे तुकडे करून खून केला. त्यानंतर त्यांनी तुकडे पोत्यात भरून हिरण्यकेशी नदीत फेकले.
इतर महत्वाच्या बातम्या




















