Raju Shetti on Goku Election: रंगमंचावर आल्यावर आमची भूमिका बदलेल, दोन दिवसांनंतर आम्ही उसाचा दर मागणार आहे, त्यांना काय सोडणार नाही, पण आता गोकुळच्या बाबतीत बंटी पाटलांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभे आहोत, त्यात काही शंका असण्याचे कारण नाही, असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बोलून दाखवला. कोल्हापुरात गोकुळसाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून काल पॅनेल घोषित करण्यात आल्यानंतर राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेवरून, शक्तिपीठ आणि गोकुळच्या निवडणुकीवरून भाष्य केले.
शिकांत पाटील चुयेकर हेच पहिले अध्यक्ष असतील
दरम्यान, पॅनेल घोषित करताना सतेज पाटील यांनी शशिकांत पाटील चुयेकर हेच पहिले चेअरमन असतील, अशी घोषणा केली. यावेळी बोलतान राजू शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातील गोकुळच्या सभासदाची मन की बात सांगितली. राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही शिरोळमध्ये गणपतराव पाटलांसोबत भेटीगाठी करण्यसाठी फिरत होतो, तेव्हाच एक मतदार भेटला. तो सभासद म्हणाला की, तुम्ही सांगताय म्हणून आम्ही 24 मते देतो पण एक मत आम्ही शशिकांत पाटील यांना द्यायचं ठरवलंय, इतक्या तळागाळात हा संदेश पोहोचल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
तर दुधाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होणार
राजू शेट्टी यांनी सांगितले की, जिथं दुधाचं उत्पादन जास्त होतंय, मग करवीर तालुका असेल, पन्हाळा तालुका असेल, भुदरगड, राधानगरी आणि आजरा या तालुक्यातूनच प्रामुख्याने शक्तीपीठ महामार्ग जातो, आणि त्यामुळे जी वर्षानुवर्ष बागायत जमीन होती, ती जमीनच जर रस्त्याखाली गेली आणि बाकी पुराखाली जमीन गेली, तर दुधाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होणार आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून 2029 च्या निवडणुकीमध्ये 55 ते 60 हजार कोटी रुपये काळा पैसा वापरता यावा म्हणून लादायचा प्रयत्न केला जातोय, त्याचं उत्तर गोकुळचे ठरावधारक या निवडणुकीमध्ये निश्चितच देतील, असे ते म्हणाले. या शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातून किमान 25 लाख टन उसाचं उत्पादन घटणार आहे, तसंच जवळपास 2 ते अडीच लाख लिटर दुधाचं उत्पादन सुद्धा घटणार आहे, हे आपल्याला परवडणारं नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
पहिले चेअरमन शशिकांत पाटील चुयेकर असतील
दरम्यान, सतेज पाटील म्हणाले की, हे पॅनेल निवडून आल्यानंतर आमचे पहिले चेअरमन शशिकांत पाटील चुयेकर हे असतील. शशिकांत पाटील चुयेकर यांना शेवटच्या वर्षी चेअरमन करायचं ठरलं होतं, मांडव घातला होता, फटाकड्या गुलाल आणला होता, आता आणलेल्या या फटाकड्या, आणलेला गुलाल हा पुन्हा एकदा चुयेकर साहेबांच्या स्मृतीला अभिवादन देण्यासाठी या जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांनी आमच्यावर राहावं एवढी विनंती करतो, असे आवाहन सतेज पाटील यांनी केले दुसरीकडे, गोकुळच्या निवडणुकीत आता राजकीय रणधुमाळीला धार आली आहे. महायुतीने जागावाटपाचा तिढा सोडवत पॅनलची दिशा स्पष्ट केल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीनेही आपलं पॅनल जाहीर केलं. आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत 25 उमेदवारांची नावे जाहीर केली यामध्ये प्रामुख्याने 18 नवीन चेहऱ्यांना संधी देत महायुतीसमोर राजकीय आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत दूध संघाच्या सत्तेसोबतच महायुती विरुद्ध राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी अशी राजकीय प्रतिष्ठेची लढाई रंगण्याची चिन्हं आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
