कोल्हापूर : प्रचंड घोषणाबाजी आणि हुर्रेबाजीमध्ये गोकुळची (Gokul) आज (15 सप्टेंबर) वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या एका तासामध्ये गुंडाळण्यात आली. सत्ताधारी गटाकडून सभासदांकडून उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आल्याचा दावा करण्यात आला, तर विरोधकांकडून ठरावधारकांना मत मांडू दिले गेले नाही, असा आरोप करण्यात आला. सभेला दुपारी एक वाजता झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात गोंधळामध्ये
प्रवेशद्वारावर ठराव पाहून सभासदांना सभा मंडपात सोडण्यात येत असतानाच जमलेल्या गर्दीने बॅरिकेट्स तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सभेला सुरुवात होण्यापूर्वीच अनागोंदी निर्माण झाली. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात गोंधळामध्ये झाली. गोंधळामध्ये नेमकं काय चाललं आहे हेच कोणाच्या लक्षात येत नव्हते. घोषणाबाजी दोन्ही गटांकडून गटाकडून करण्यात आली. यावेळी बॅनरही उंचावण्यात आले. विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक या सभासदांमध्ये उभारून होत्या. त्या व्यासपीठावर गेल्या नाहीत. वार्षिक सभा तासात गुंडाळण्यात आल्यानंतर शौमिका महाडिक यांनी समांतर घेत असल्याचे जाहीर केले.
काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं
सभा पार पडल्यानंतर गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी माध्यमांशी बोलताना शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, उपस्थित करण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे वाचून दाखवण्यात आली. काही लोकांना सभाच चालू द्यायची नव्हती. सर्व विषय सभेत मंजूर झाले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारायचे असतात. संचालकांनी नाही. असे असतानाही त्या प्रश्न विचारणार असल्याचे म्हणत होत्या. त्यांना जे जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत त्यांनी ते बोर्ड मीटिंगमध्ये उपस्थित करावेत, असे अरुण डोंगरे यावेळी म्हणाले.
या ठिकाणी सभासदांना बोलायची संधी होती. काविळ होऊन पिवळं दिसत असल्यास काय करायचं? 'अमुल' वाढेल की नाही माहीत नाही. मात्र, अमुल वाढवायला हे लोक हातभार लावत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. सभासदांनी बोलायचं असताना आवाज दाबण्याचा प्रश्नच येत नाही. बोर्ड मिटींगला सातत्याने त्या गैरहजर असतात, आमच्याकडे नोंद असल्याचे अरुण डोंगळे म्हणाले. सभेसाठी 5206 खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. यासंदर्भात आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती, असे डोंगळे यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या