Sambhajiraje Chatrapati on har har mahadev : ऐतिहासिक चित्रपटांचे पहिलं स्क्रिनिंग महाराष्ट्रात झालं पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. हर हर महादेव चित्रपटात स्त्रियांविषयी आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. इतिहास संशोधकांनी बोलावे. जर माझी भूमिका चुकीची असेल, तुम्ही सांगावे, मी पुन्हा कधीही अशा चित्रपटांवर पत्रकार परिषद कधीही घेणार नाही. बाजीप्रभू आणि शिवाजी महाराजांची लढाई दाखवणं मान्य आहे का? चुकीचा इतिहास दाखवण्यापेक्षा चित्रपट काढूच नका, खरा इतिहास दाखवा, विरोध थांबवतो, असे संभाजीराजे म्हणाले. 


संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) आज बेळगाव दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी हर हर महादेव चित्रपट झी मराठीवर दाखवला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. संभाजीराजे म्हणाले, नव्या पिढीचं वाचन कमी झालं आहे. मी अजून चित्रपट पाहिलेला नाही, पण इतिहासकारांनी हा चित्रपट पाहूच नका असे सांगितले आहे इतक्या चुकीच्या पद्धतीने मांडणी करण्यात आली आहे. ऐतिहासिक चित्रपटासाठी इतिहासकारांची नेमणूक आवश्यक आहे. चित्रपटात पाटील हा बलात्कारी दाखवला हे कुठं लिहिलं आहे? स्यियांना सन्मान हे शिवरायांची परंपरा यांनी चित्रपटात स्त्रियांचा बाजार मांडला आहे. शिवरायांचा काळात स्त्रियांचा बाजार भरला होता का? हे इतिहासकारांनी सांगावं. बाजीप्रभूंचा इतिहास चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड सुरु आहे. 


संभाजीराजे (Sambhajiraje Chatrapati on har har mahadev) पुढे म्हणाले की, बाजीप्रभू शिवरायांना भेटत असताना एकदाच पगडी घातली आहे. बाजीप्रभूंना वाढवतानाही त्यांना कमी करत आहात. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाची मोडतोड झाली आहे. केंद्रीय समितीवर आमचा विश्वास नाही. अशा चित्रपटांचे पहिल्यांदा महाराष्ट्रात स्क्रिनिंग झालं पाहिजे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या