Kolhapur News : कोल्हापूर अर्बन बकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबरला मतदान, तर 15 नोव्हेंबरला मतमोजणी आहे. यासाठी 28 हजार सभासद सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान मतदान करतील. जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून ते 12 तारखेपर्यंत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आहे.


राज्यात महापूर, अतिवृष्टीमुळे पुढे ढकललेल्या निवडणुकांवरील स्थगिती उठली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल चार हजार सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, जिल्हा व तालुका संघ, साखर कारखान्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर अर्बन बँकेच्या पुणे, कोल्हापूर व रत्नागिरी येथे शाखा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत. गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी बँक चर्चेत आहे. बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या मारहाणीचा मुद्दाही या निवडणुकीत येऊ शकतो.


निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे 



  • अर्ज दाखल - 7 ते 12 ऑक्‍टोबर 

  • अर्ज छाननी - 13 ऑक्‍टोबर 

  • ऑक्‍टोबर पात्र उमेदवारांची यादी -  14 ऑक्‍टोबर 

  • अर्ज माघारी - 14 ते 28 ऑक्‍टोबर

  • चिन्ह वाटप - 31 ऑक्‍टोबर

  • मतदान - 13 नोव्हेंबर

  • मतमोजणी व निकाल - 15 नोव्हेंबर


इतर महत्वाच्या बातम्या