Eknath Shinde Kolhapur : "काल श्रीकांतने माझे डोळे उघडले कारण मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय. मी घरी जायचो तेव्हा सगळे झोपलेले असायचे. पिता-पुत्रांची भेट महिना-महिना होत नव्हती. हे श्रीकांत (Shrikant Shinde) तुमच्यासमोर बोलणार नाही. कारण तो तुम्हाला आपले कुटुंब समजतो. तो बोलला माझ्या बापाचा मला अभिमान आहे, मला पण त्याचा अभिमान आहे", असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. कोल्हापुरात शिंदे गटाचे महाअधिवेशन सुरु आहे. यावेळी ते बोलत होते.  


'संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे'


एकनाथ शिंदे म्हणाले, मी मनमोकळेपणाने सर्व सोडले असते. मी कधीही कोणते पद मागितले नाही. दुसरीकडून मात्र, छल कपट करण्यात आले. आता माझ्याकडे वेळ नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझे कुटुंब आहे. 'माझे कुटूंब माझे घर' असं माझं नाहीये. ⁠माझे कार्यकर्ते आणि राज्याची जनता माझे टॅानिक आहे. ⁠हीच लोकं माझे कवच कुंडले आहेत. मारने वाले से बडा बचानावाला होता है, असेही शिंदेही यांनी नमूद केले.


पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले,⁠जो स्वतःसाठी कधी जगला नाही असा एकनाथ शिंदे तुम्हाला का दिसला नाही? मी श्रीकांतच्या मतांशी सहमत आहे. ⁠राजा का बेटा राजा नही होगा हे खरंय जो काम करेल तोच राजा होईल. ⁠मी पण असच भाषण ऐकायचो आणि आज मुख्यमंत्री झालो पुढचा मुख्यमंत्री पण आपल्यातूनच झाला तर मला अभिमान वाटेल. ⁠ते स्वतःला मालक आणि आपल्याला नोकर समजतात, अशी टीकाही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 



 राज्यात मोठी गुंतवणूक आणली


आज मी ३ लाख कोटींची गुंतवणूक आणली. ⁠शेती आणि माताशी माझी नाळ जुडलेली आहे. हेलिकॅाप्टर मधून जावून शेती करणारा पाहिजे की हेलिकॅाप्टर मघून फोटो काढणारा पाहिजे. माझ्या व्याखेत सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॅामन मॅन ही व्याख्या आहे. ⁠या दाढीने तुमच्या अंहकारीची गाडी खड्डायत घातली नाही ⁠म्हणून दाढीच्या नादी लागू नका. ⁠कोविड मध्ये फिरणारे कोण आणि फेसबूक लाईव्ह करणारे कोण हे सर्वांना माहिती आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : मी कधीच कोणाला घाबरत नाही; दाऊद आला, शकील आला पण मी कोणाच्या धमकीला घाबरत नाही : एकनाथ शिंदे