एक्स्प्लोर

Gokul: गोकुळच्या 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात 13 कोटींचा हिशेब लागेना, ठाकरे गटाकडून ईडी चौकशी मागणी

Gokul: किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी ठेवला आहे.

Gokul: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या भोर (जि. पुणे) येथील 'किकवी' दूध पॅकेजिंग प्रकल्प व जमीन खरेदी व्यवहारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी अधिकारी कृष्णा ठाकरे यांनी ठेवला आहे. खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेतील 13 कोटी रुपयांच्या खर्चाचा कोणताही विनियोग तपशील सापडलेला नाही. 

शिवसेना ठाकरे गटाकडून ईडी चौकशीची मागणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या प्रकरणाची 'ईडी' (ED) मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर दरोडा टाकला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, 'गोकुळ'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश गोडबोले यांनी सांगितले की, राज्य शासनाने किकवी प्रकल्पाबाबत जी माहिती मागवली होती ती सर्व दिली आहे आणि पुढील चौकशीसाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल

चौकशी अहवालातील 6 प्रमुख ठपके

  • निबंधकांची मंजुरी नाही: डेअरी प्रकल्प व जागा खरेदीसाठी सहकार निबंधकांची मंजुरी घेण्यात आली नाही.
  • पारदर्शकतेचा अभाव: ई-निविदा पद्धत वापरली गेली नाही आणि निविदेसाठी केवळ ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला.
  • फेरनिविदा नाही: आलेल्या ३ निविदांपैकी २ अपात्र ठरल्यानंतरही फेरनिविदा मागवण्यात आल्या नाहीत.
  • सदोष मूल्यमापन: दूध प्रकल्प व जमिनीच्या मूल्यमापनाची (Valuation) पद्धत त्रुटीपूर्ण होती.
  • अनामित खर्च: नोंदणी व इतर अनुषंगिक १३ कोटी रुपयांच्या खर्चाचा तपशील उपलब्ध नाही.
  • सर्च रिपोर्ट गहाळ: खरेदी-विक्री व्यवहाराचा अधिकृत तपशील व सर्च रिपोर्ट दिसून येत नाही.

मल्टीस्टेटसाठी मला 200 कोटींची ऑफर

दुसरीकडे, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गोकुळचे मल्टिस्टेट करण्यासाठी मला तब्बल 200 कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा राजकीय बॉम्ब टाकल्यानंतर गोकुळच्या भर निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मल्टिस्टेटचा मुद्दा तापला आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. जानकर यांनी बोलताना म्हटलं आहे की, गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी कोट्यवधीच्या आमिषाला आपण ठोकर दिली. दरम्यान, सतेज पाटील यांनी म्हटलं की, गोकुळ मल्टिस्टेट झाला नसल्यामुळेच आज गोकुळची निवडणूक लागली आहे. गोकुळ जर मल्टिस्टेट झाला असता तर गोकुळची निवडणूक कधी झाली हेच दूध उत्पादकांना कळालं नसतं. मात्र आम्ही त्या विरोधामध्ये लढा दिला आहे. या दाव्यामध्ये तथ्य असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
Pune Teacher Constituency: 'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
'भाजपनं कोणाला तिकीट दिलं हा त्यांचा अंतर्गत विषय...' पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत वादाची ठिणगी! उदय सामंत म्हणाले, मंगेश चिवटे हेच आमचे उमेदवार
Pune Teacher Constituency: पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथ शिंदे साहेबांनी..
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरही मंगेश चिवटे शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल करणार! बंडखोरी की दबावतंत्र? म्हणाले, मला एकनाथजी शिंदे साहेबांनी..
Kaustubh Gawade: पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत?
पुणे शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी; स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे कोण आहेत?
Advertisement

व्हिडीओ

Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Uddhav Thackeray Mumbai Morcha: बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Sanjay Raut: फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
फडणवीसांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, अमित शाह अंडरग्राऊंड झालेत; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Satej Patil: तर मग एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार निर्दोष कसे असू शकतात? त्यांना हटवून न्यायालयीन चौकशी करा अन्यथा केवळ फार्स; सतेज पाटलांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
Jantar Mantar Delhi Police: कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
कोणी बसची हवा काढली, कोणी गाडीच्या चाव्या पळवल्या, इमर्जन्सी एक्झिट अन् काचा फोडून उड्या मारल्या, दिल्लीच्या जंतरमंतरवर जेन झीने पोलिसांना रडकुंडीला आणलं
Girija Oak Photos: नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
नॅशनल क्रश गिरीजा ओकचा ग्लॅमरस लूक; अभिनेत्रीने लाल ड्रेसमध्ये वेधलं लक्ष, हाय स्लिट गाऊनमध्ये दिसते सुरेख
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
पुण्यातील विधानपरिषदेच्या जागेवरुन शिवसेनेत नाराजी; एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता, नेमकं काय घडतंय?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
मंगेश चिवटेंकडून पुण्यात उमेदवारी अर्ज भरण्याची जय्यत तयारी, पण शिवसेनेच्याच नेत्याने हात झटकले, म्हणाला, 'आमचा त्यांच्या उमेदवारीशी काही संबंध नाही'
Raigad Crime News: 'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
'मी जीवन संपवतोय', पत्नीला शेवटचा मेसेज पाठवला, मोबाईल बंद केला अन्...; विठूरायाच्या भक्ताने टकमक टोकावरून उडी मारून जीवन संपवलं
Embed widget