कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक आत्महत्यांची मालिका (Kolhapur Crime) सुरुच असून आता त्यामध्ये गावचे उपसरपंच तसेच माध्यमिक शिक्षक यांच्या पत्नीचा समावेश झाला आहे. आकुर्डे (ता.पन्हाळा) येथील उपसरपंच अनिल पाटील यांच्या पत्नीने‌ राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सुरेखा ऊर्फ स्वाती अनिल पाटील (वय 40) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची कळ पोलिसांमध्ये झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सुरेखा यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.


आत्महत्या केलेल्या सुरेखा पाटील यांचे पती अनिल पाटील गावचे उपसरपंच आहेत. तसेच पन्हाळा तालुक्यातील काटेभोगावमध्ये हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षक आहेत. शनिवारी (ता.12) पती अनिल हॉलमध्ये तर पत्नी सुरेखा या बेडरुममध्ये विश्रांती घेत होत्या. दुपारी एकच्या सुमारास अनिल पाटील यांनी पत्नी सुरेखा यांना हाक मारली पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बराच वेळ झाल्यानंतर शेजारच्या लोकांना बोलावून दरवाजा तोडला. त्यावेळी सुरेखा यांनी छताच्या हुकाला साडीने गळफास घेतला होता. 


रेंदाळमध्ये तरुणाची आत्महत्या


दरम्यान, रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील तरुणाने राहत्या घरी सुती कापडाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. ओम पंढरीनाथ महाजन (वय 18) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. ओम हा बारावी उत्तीर्ण होता. त्याच्या मागे आई, वडिल असा परिवार आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. 


शाळा सुटताना थेट पालकांमध्येच तुंबळ हाणामारी; एकाचा मृत्यू


Kolhapur News: दोन लहान मुलांच्या भांडणात पालक भिडल्याने एका पालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये घडली. सद्दाम सत्तार शेख (वय 27 , रा. स्वामी मळा, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. हा भयानक प्रकार कोले मळा येथील एका शाळेत घडला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सद्दामच्या मृत्यू प्रकरणी शब्बीर अब्दुल गवंडी (रा. हनुमाननगर) याच्यासह दोन महिलांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सद्दामच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी संशयित शब्बीरच्या दारावर लाथा मारून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. 


झटापट आणि लाथाबुक्क्यांनी मारामारी झाल्याने शेख जमिनीवर कोसळला. हा राडा पाहून शाळेत शेखच्या नातेवाईकांसह भागातील नागरिकही जमले. त्याला तातडीने शेखला दुचाकीवरून आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र शेख यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यामुळे शिक्षकांनी वाद मिटवूनही मुलांचे पालक शाळा सुटताना पुन्हा आल्याने परत वादाला तोंड फुटून एकाचा जीव गेला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या