एक्स्प्लोर

Crime News: कोल्हापुरातील गडहिंग्लजमध्ये ओढ्यात आढळला शिर नसलेला महिलेचा मृतदेह; घातपाताचा संशय, मृत महिला 24 दिवसांपूर्वी झालेली बेपत्ता

Crime News: सध्या या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी हा खून असल्याच्या संशयातून पोलीस देखील तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातल्या नेसरी महागाव रोडवरील ओढ्यालगत एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. या घटनेने गडहिंग्लज (Kolhapur Crime News) महागाव परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह भडगावमधील एका महिलेचा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी पोलिसांनी मात्र याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या महिलेचा अपघाती मृत्यू झाला की तिचा खून करण्यात आला आहे, हे देखील अद्याप गुलदस्त्यात (Kolhapur Crime News) असून गडहिंग्लज पोलिसांकडून याचा तपास सुरू करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी हा खून असल्याच्या संशयातून पोलीस देखील तपास करत असल्याची माहिती समोर येत आहे.(Kolhapur Crime News)

बाजाराला जाते सांगून घराबाहेर पडल्या अन्...

तीन आठवड्यांपूर्वी गडहिंग्लजला बाजाराला जाते, असे सांगून त्या घरातून बाहेर पडल्या. याच महिलेचा शिर नसलेला मृतदेह महागाव येथील ओढ्याच्या पात्रात सापडला. त्यामुळे या महिलेसोबत घातपात झाला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. सुनीता संजय केसरकर (वय ४०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) असे त्यांचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.(Kolhapur Crime News)

तर एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिस आणि ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथील संजय केसरकर हे ऊसतोडणीच्या मजुरीचे काम करतात. त्यांच्या पत्नी सुनीता याही बांधकामाच्या कामावर मजुरीला जात होत्या. १८ जानेवारीला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्या घरातून निघून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्या बेपत्ता झाल्याची माहिती त्याने पोलिस ठाण्यात दिली होती.

बुधवारी (११ फेब्रुवारी) महागाव-मासेवाडीच्या दरम्यान घंटीचा झरा नावच्या ओढ्याच्या पात्रात शिर नसलेला आणि उजव्या पायाची हाडे दिसत असलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

चप्पल, साडी अन् बांगड्यांवरून पटली ओळख

मृतदेहाच्या जवळच सापडलेली चप्पल, अंगावर असलेली साडी, बांगड्या व हातातील काळा दोरा यावरून तो मृतदेह सुनीता सुनाता यांचाच असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द केला. सुनीता यांच्याकडे मोबाइल होता. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी नातेवाइकांनी मोबाइलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता, अशी माहिती देखील नातेवाइकांनी दिली.

पोलिसांसमोर मोठे आव्हान

मृतदेहावर शिर नव्हते, उजव्या पायाची हाडे दिसत होती. शरीरापासून शिर कसे वेगळे झाले? याची चर्चा घटनास्थळी होती. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
श्रीमंतांना लक्ष्य करून हनी ट्रॅपमध्ये अडकवायची, लॉजवर बोलवून लुटायची; फॅशन डिझायनरला अटक, साथीदार फरार
Kolhapur : फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
Embed widget