Kolhapur Municipal Corporation : नगररचना विभागाकडील कामांबाबत व तक्रारींबाबत नागरिकांना कोल्हापूर मनपा प्रशासक डाॅ.  कादंबरी बलकवडे  नगररचना कार्यालयात दर गुरुवारी दुपारी 3.30 ते 5.30 या कालावधीत भेटणार आहेत.


शासन परिपत्रकानुसार शहरातील नागरीकांना भेटणेसाठी महापालिकेने बुधवार व गुरुवार असे दोन दिवशी निश्चित केले आहेत. या दिवशी शहरातील नागरीकांच्या विविध समस्या व तक्रारीबाबत प्रशासक कार्यालयात नागरिक भेटावयास येतात. यावेळी प्रशासक तथा आयुक्त नागरीकांच्या तक्रारींची, कामांची दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याच्या दृष्टीने बुधवार व गुरुवारी आयुक्त कार्यालयात भेटतात. या भेटीदरम्यान प्रशासनाला असे निदर्शनास आले की नगररचना विभागाकडील तक्रारीचे प्रमाण जास्त आहे. 


त्यामुळे निश्चित करुन दिलेल्या वेळेमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल करण्यात आला आहे. यामध्ये नगररचना विभागाकडील नागरिकांच्या तक्रारीबाबत भेटीसाठी प्रत्येक गुरुवारी दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत राजारामपुरी येथील सहाय्यक संचालक नगररचना कार्यालय येथे नागरीकांच्या तक्रारी घेण्यात येणार आहेत. 


तर नगररचना विभागा व्यतिरिक्त अन्य विभागांच्या तक्रारींसाठी प्रत्येक बुधवारी दुपारी 3.30 ते 5.30 या वेळेत मुख्य इमारत प्रशासक कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. शहरातील नागरीकांनी आपल्या तक्रारी महापालिकेने निश्चित करुन दिलेल्या वेळेत व निश्चित केलेल्या ठिकाणी नोंदवाव्यात असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


नोव्हेंबर 2019 मध्ये कोल्हापूर मनपाचा कार्यकाळ संपल्याने बलकवडे सध्या प्रशासक आहेत. त्यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे की, नगर नियोजनाव्यतिरिक्त इतर विभागांशी संबंधित तक्रारी असलेल्या नागरिकांनी बुधवारी KMC मुख्य इमारतीत भेटू शकतात. 


बांधकाम परवानगी, बिल्डिंग लेआउट आणि इतर अनेक समस्यांबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांना तांत्रिक उत्तरे द्यावी लागतात. यापूर्वी नगररचना कार्यालय शिवाजी मार्केट विभागीय प्रभाग इमारतीत होते, जे महापालिकेच्या इमारतीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. कोरोना साथीच्या आधी कार्यालय राजारामपुरी येथे हलविण्यात आले आणि अधिकाऱ्यांना तक्रारींचे निराकरण करण्यासाठी केएमसीकडे फायली घेऊन लांबचा प्रवास करावा लागतो. 


इतर महत्वाच्या बातम्या